मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2021 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कपाशी पिकातील गुलाबी बोंड अळीचे संपुर्ण नियंत्रणासाठी काय केले पाहिजे आणि फवारणी केव्हा केली पाहिजे

  कपाशी पिकातील गुलाबी बोंड अळीचे संपुर्ण  नियंत्रणासाठी काय केले पाहिजे आणि फवारणी केव्हा केली पाहिजे *गुलाबी बोंडअळीचे पतंग अंडि जास्त घालत असल्याने, फक्त गुलाबी बोंड अळी मारूनच चालणार नाही, तर त्या गुलाबी बोंडअळीची अंडी पूर्णतः नष्ट केली, तरच बोंडअळी पासून सुटका होऊ शकते. त्यासाठी लार्विनची फवारणी करावी.*  * लार्विन हे अळी, अंडी आणि पतंग यांना मारते.* *🎯 लार्विन 30 ग्राम प्रती पंप - फूल अवस्था आणि पाती अवस्था मध्ये फवारणी करावी , कारण बोंडअळी ही फूल आणि पाती मध्येच येते*। ✅ *जीवनचक्र:-* गुलाबी बोंड अळी ही कापूस पिकावरील एक प्रमुख कीड आहे. मागील काही वर्षांमध्ये या किडने जणूकाही थैमानच घातला आहे. असा शेतकरी नाही, की ज्यांना बोंडअळी माहित नाही. कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी ही ही उशिरा येणारी किडि म्हणजे लागवडीपासून 90 दिवसांत येणारे कीड आहे. परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून ही कीड ६०  दिवसांतच आढळून आली आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, जळगाव, बुलढाणा, अकोला, अहमदनगर, नांदेड,वर्धा, यवतमाळ, बीड जिल्ह्यात या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. जवळपास 20 ते 3

पंजाब डख- राज्यात सह देशातील इतर राज्यात पडणार 29 ऑगस्ट ते 10 संप्टेबर दरम्याण पडणार धो-धो पाउस*

 *पंजाब डख- राज्यात सह देशातील इतर राज्यात पडणार 29 ऑगस्ट ते 10 संप्टेबर दरम्याण पडणार धो-धो पाउस* 🔴 *माहितीस्तव - बंगालच्या उपसागरात विषाखा पटणम जवळ पक 29 तारखेला चक्राकार स्थिती निर्माण होत आहे त्याचे रूपांतर चक्रीवादळात होउन ते महाराष्ट्राकडे झेपवणार आहे . म्हणून आपल्या राज्यात पडणार आहे. 29,30,31 ऑगस्ट व 1,2,3 सप्टेबर राज्यात मुसळधार पाउस पडणार आहे. तो पाउस नांदेड, परभणी लातूर, सोलापूर, उस्मानाबाद सांगली. नगर बिड जालना बुलढाणा , अकोला , अमरावती, यवतमाळ, वाशिम हिंगोली जळगाव धुळे औरंगाबाद नाशिक पूणे नाशिक मुंबई या जिल्हात जास्त पाउस पडणार आहे. या जिल्हातील धरण क्षेत्रात या पावसाने आवक येण्यास सुरवात होइल . उर्वरीत राज्यात देखील ठिक ठिकाणी जोरदार पाउस पडणार आहे. व काही भागात तूरळक पाउस पडेल .जनतेने सर्तक रहावे .*  🟡 *29 ऑगस्ट ते 10 संप्टेबर या दरम्याण महाराष्ट राज्यासह इतर राज्यात देखील पाउस पडणार आहे . तामिळनाडू, केरळ कर्नाटक आंध्रप्रदेश तेलागंणा महाराष्ट्र छत्तीसगड मध्यप्रदेश उत्तरप्रदेश बिहार ओडीला गुजरात राजस्थान या राज्यात देखील 10 संप्टेबर पर्यंत जोरदार पाउस पडेल व पिकांना

कामगंध सापळ्याची कीड व्यवस्थापनातील भूमिका

 कामगंध सापळ्याची कीड व्यवस्थापनातील भूमिका          शेतकरी बंधूंनो कीटक हे स्वजातीययांशी सुसंवाद साधण्यासाठी स्वतःच्या शरीरातून विशिष्ट गंध असलेल्या रसायनांचे मिश्रण बाहेर सोडतात ही रसायने त्यांच्यामध्ये विशिष्ट प्रतिक्रिया निर्माण करून संदेशवहनाचे कार्य करतात यांना इंग्रजीत फेरोमोन असे म्हणतात सध्या काही किटकांचे कृत्रिम रित्या तयार केलेले फेरोमोन विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहेत सर्वसाधारणपणे मादी पतंगाच्या वासा द्वारे (कामगंधा द्वारे ) नर पतंगांना आकर्षित करून सापळ्यात पकडून त्यांचा नाश करून म्हणजेच त्यांच्या मिलना मध्ये बाधा निर्माण करून पतंग वर्ग किडीचे व्यवस्थापन मिळण्यासाठी फेरोमन चा मोठ्या प्रमाणात कपाशी, तुर, हरभरा सोयाबीन यासारख्या पिकात वापर होत आहे. समागमासाठी कार्यक्षम सहचर शोधण्यासाठी काम गंधाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो याच्या गंधाने विरुद्धलिंगी कीटक परस्पराकडे मिलनासाठी आकर्षित होतात या तत्त्वाचा वापर प्रामुख्याने खालील तीन प्रकारे कीड व्यवस्थापनासाठी करता येतो  (1) फेरोमोन सापळे वापरून किडींचे सर्वेक्षण करणे  (2) मोठ्या प्रमाणात किडीचे पतंग सापळ्यात पकडून त्यांचा न

कपाशीवरील रस शोषणाऱ्या कीडीच्या व्यवस्थापनासंदर्भात पीकसंरक्षण संदेश

 कपाशीवरील रस शोषणाऱ्या कीडीच्या व्यवस्थापनासंदर्भात पीकसंरक्षण स                  शेतकरी बंधूंनो कापूस पिकात सुरूवातीच्या काळात प्रामुख्याने मावा तुडतुडे फुलकिडे या या रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. पिकाचा रोपावस्थेत तसेच शेवटच्या अवस्थेत कापूस पिकात मावा या रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो.जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून सप्टेंबरच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यापर्यंत तुडतुडे या रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कपाशी पिकावर आढळून येतो. कपाशी पिकात प्रामुख्याने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात  प्रामुख्याने फुलकिडी या रस शोषणाऱ्या किडींचा जास्त प्रादुर्भाव आढळून येतो. दोन पावसात जास्त खंड पडल्यास फुलकिडे या किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. पांढरी माशी या रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कपाशी पिकात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतो.पांढरी माशी ही कीड कपाशीच्या पानाच्या खालच्या बाजूने राहून रस शोषण करते अशी पाने कोमजतात व पिल्ले आपल्या शरीरातून गोड चिकट द्रव बाहेर टाकतात त्यामुळे पानावर काळी बुरशी वाढते. शेतकरी बांधवांनी सद्यस्थितीत कापूस पिका बाबत नियमित सर्वेक

जिवाणू व जैविक बुरशीबाबत माहिती

जिवाणू व जैविक बुरशीबाबत माहिती  नत्र स्थिर करणारे जिवाणू यात चार प्रकारचे नत्र स्थिर करणारे जिवाणू आहेत. हे हवेतील मुक्त नत्र शोषून घेवून पिकांना उपलब्ध करून द्यायचे काम करतात. 1] सहयोगी जिवाणू अॅसिटोबॅक्टर आणि रायझोबियम यांचा   समावेश होतो. यांना नत्र स्थिर करण्यासाठी रोपांची गरज असते. हे रोपांच्या मुळात शिरून मुळावर गाठी निर्माण करतात व त्याद्वारे नत्र स्थिर करतात. 2] सह - सहयोगी या पध्द्तीत जिवाणू अझोस्पायरीलम मुळामध्ये प्रवेश करून नत्र स्थिर करतात. 3] असहयोगी प्रकारात जिवाणू अॅझोटोबॅक्टर जमिनीत स्वतंत्र राहून नत्र स्थिर करतात. यांच्या वापरामुळे रासायनिक खतामध्ये 25-30% बचत होते. प्रमाण :---  ते 1.5 लिटर प्रति एकर.   स्फुरद विरघळवणारे जिवाणू स्फुरद विरघळवणारे जिवाणू बॅसिलस मॅगाटेरीयम व्हार फाॅस्फरियम हे जमिनीतून सेंद्रिय कर्बावर जगून वाढीदरम्यान सेंद्रिय आम्ल तयार करून जमिनीतील फाॅस्फरस विरघळवण्याचे कार्य करून पिकांना उपलब्ध करण्याचे काम करतात.यांच्या वापरामुळे मुळांची वाढ होण्यास मदत होते.तसेच वाढ होणारे हार्मोन तयार करतात. यांच्या वापरामुळे रासायनिक खतांची 25-30% बचत होते. प

ट्रायकोडर्मा व्हीरीडी

ट्रायकोडर्मा व्हीरीडी ट्रायकोडर्मा बुरशीचा वापर आजकाल सर्व शेतकरी बांधव करताना दिसतात. जस जसे रासायनिक बुराशीनाशकांचे दुष्परिणाम शेतकरी बंधूंना समजू लागले तेव्हा पासून ट्रायकोडर्मा या बुरशीचा रोग नियंत्रणात वापर वाढू लागला आहे. जमिनीद्वारे, बियांमार्फत पसरणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा बुरशीचा वापर केला जातो. पानांवरील रोगकारक बुरशींच्या नियंत्रणासाठी देखील ट्रायकोडर्माची फवारणी फायदेशीर ठरते आहे; परंतु त्यासाठी बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण शेतात उपलब्ध असणे आवश्यक असते. जमिनीत रासायनिक बुरशीनाशकांची कार्यक्षमता जास्त काळ टिकून राहत नाही, तसेच त्यामुळे जमिनीतील सूक्ष्मजिवांच्या कार्यक्षमतेवर देखील विपरीत परिणाम होतो परंतु ट्रायकोडर्मा बुरशीची कार्यक्षमता जमिनीत खूप काळ टिकून राहते आणि सूक्ष्मजिवांसाठी अनुकूल असते. प्रयोगशाळेत ट्रायकोडर्मा भुकटी (ग्लुकोज बेस ) स्वरूपात तयार केली जाते. जास्तकरून भुकटी (ग्लुकोज बेस पावडर ) स्वरूपातील उत्पादने मातीमध्ये शेणखतातून, सेंद्रिय खतातून मोठ्या प्रमाणात वापरली जातात तसेच पाण्याद्वारे देखील ठिबक सिंचनातून जमिनीत देता येते. ट्रायक

वाटर सोल्युबल ला दानेदार खते पर्याय ठरू शकतात का ? त्याचे फायदे तोटे काय?

 *आजचा प्रश्न*    वाटर सोल्युबल ला दानेदार खते पर्याय ठरू शकतात का ? त्याचे फायदे तोटे काय? ➖➖➖➖➖➖➖➖➖ मित्रहो अधुन मधून वाटर सोलुबल च्या भेसळी बाबत बातम्या येतात व शेतकऱ्यांच्या मनात फसवलेजात असल्याची खंत सुरु होते; पण याला जबबाबदार तर आपणच आहोत!!    मित्रहो 10 -20 वर्षापुर्वी वाटर सोलुबल खते अगदी नव्हतीच म्हटले तरि चुकिचे ठरणार नाही!!  मग तेव्हा उत्पन्न निघत नव्हते का?  बागा पिकत नव्हत्या का?     ड्रिप इरिगेशन आले व त्यासोबत वाटर सोलुबल चे तंत्र ही आले !! ज्या इस्राईल मधून हे तंत्र आले ते कंप्यूटर कण्ट्रोल फर्टिगेशन करतात !!  फ़िल्टर चे प्रेशर गेज वर्षातून कधीतरी पहणारे आम्ही केव्हा कंप्यूटर ऑटोमोशंन समजनार !!  आमच्याकडे असते ते केवळ आंधळे अनुकरण!!  ते पीपीएम मध्ये खते देतात आम्ही किलो मध्ये देतो!!      एखाद्या तंत्राची एक बाजू पाहून आम्ही एवढे वेडे होतो की त्याची दूसरी बाजू आम्हाला दुष्परिणाम दिसल्याशिवय लक्षातच येत नाही!! ➖➖➖➖➖➖➖➖➖      मित्रहो वाटर सोलुबल आपण ज्या अशास्रीय मोघम पनाने वपरतो त्यामुळे आपण अनेक समस्यान्न तोंड देत आहोत !!! जादा पीपीएम मुळे PH वाढतो EC वाढतो ', झाड़े र

ओळखा अन्नद्रव्यांची कमतरता

 *ओळखा अन्नद्रव्यांची कमतरता.* ( Deficiency Syndromes) 💧🌾 *1) नत्र -* झाडाची खालची पाने पिवळी होतात, मुळांची व झाडांची वाढ थांबते, फूट व फळे कमी येतात. 💧🌾 *2) स्फुरद -* पाने हिरवट लांबट होऊन वाढ खुंटते, पानाची मागची बाजू जांभळट होते. 🌾💧 *3) पालाश -* पानाच्या कडा तांबडसर होऊन पानांवर तांबडे व पिवळे ठिपके पडतात. खोड आखूड होऊन शेंडे गळून पडतात. 🌾💧 *4) जस्त -* पानांचे आकारमान कमी होते. पानांतील शिरांमधील भाग पिवळा पडतो. पिकांची वाढ खुंटते. पिकांमध्ये पेरे लहान पडतात. 💧🌾 *5) लोह -* शेंड्याकडील पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो, झाडांची वाढ खुंटते. 🌾💧 *6) तांबे -* पिकांच्या शेंड्याची वाढ खुंटते व पाने लगेच गळून पडतात. तसेच पाने अरुंद वाटतात. पानांचे टोक व कडा फिक्कट पिवळ्या दिसतात. 💧🌾 *7) बोरॉन -* टोकांवरील नवीन पालवीचा रंग देठाकडून फिक्कट होऊ लागतो. नवीन पाने मरतात. पानांना सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात. पिकांच्या शेंड्याकडील पाने मरतात. 💧🌾  *9) मॉलिब्डेनम* -  पाने फिक्कट हिरवी पडतात. तपकिरी ठिपके पानांवर दिसतात. पानांच्या खालच्या भागातून तपकिरी डिंकासारखे द्रव्य स्रवते.

कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या प्रतिबंध व व्यवस्थापनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स

 कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या प्रतिबंध व व्यवस्थापनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स  राजेश डवरे कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम शेतकरी बंधूंनो कपाशीवरील गुलाबी बोंड अळी अलीकडील काही काळात शेतकऱ्यासाठी कपाशीवरील एक महत्त्वाची नुकसानदायक कीड म्हणून समोर आली आहे. परंतु या किडीच्या प्रतिबंधासाठी व व्यवस्थापनासाठी खालील निर्देशित एकात्मिक व्यवस्थापन सूत्रांचा वापर केल्यास या या किडीचे प्रभावी व्यवस्थापन मिळण्यास मदत होते. (१) शेतकरी बंधुंनो कपाशीवर गुलाबी बोंड अळी प्रतिबंध करण्याकरता कोणत्याही परिस्थितीत फरदड कापूस घेणे टाळावे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात मागील कपाशीचे पीक संपूर्ण कापूस वेचणी करून कपाशी मुक्त झालेले असेल याची दक्षता घ्यावी . फरदड कपाशीला सिंचन केल्याने पाते फुले व बोंडे लागण्यात अनियमितता येऊन गुलाबी बोंड अळी ला सतत खाद्य उपलब्ध होते त्यामुळे फरदड घेणे टाळावे. असे केल्याने गुलाबी बोंड अळी ला खाद्य प्राप्त न झाल्यामुळे जीवनचक्रात बाधा निर्माण होते व पुढील हंगामात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी आढळतो. त्यामुळे  कपाशीची फरदड  घेणे

फसल के लिए आवश्यक 16 पोषक तत्वों की पहचान, और ऑपरेटिंग सिस्टम

पौधे के पोषक तत्व 16 रासायनिक तत्वों को एक पौधे की वृद्धि और अस्तित्व के लिए महत्वपूर्ण माना जाता है। 16 रासायनिक तत्वों को दो मुख्य समूहों में बांटा गया है: गैर-खनिज और खनिज।   गैर-खनिज पोषक तत्व गैर-खनिज पोषक तत्व हाइड्रोजन ( H ), ऑक्सीजन  ( O ), और कार्बन ( C ) हैं। ये पोषक तत्व हवा और पानी में पाए जाते हैं। प्रकाश संश्लेषण नामक एक प्रक्रिया में, पौधे सूर्य से ऊर्जा का उपयोग कार्बन डाइऑक्साइड ( CO2 - कार्बन और ऑक्सीजन ) और पानी (H2O- हाइड्रोजन और ऑक्सीजन) को स्टार्च और शर्करा में बदलने के लिए करते हैं। ये स्टार्च और शर्करा पौधे का भोजन हैं। प्रकाश संश्लेषण का अर्थ है "चीजों को प्रकाश से बनाना"। चूंकि पौधे हवा और पानी से कार्बन, हाइड्रोजन और ऑक्सीजन प्राप्त करते हैं, इसलिए बहुत कम किसान और बागवान यह नियंत्रित कर सकते हैं कि एक पौधा इन पोषक तत्वों का कितना उपयोग कर सकता है।खनिज पोषक तत्व 13 खनिज पोषक तत्व, जो मिट्टी से आते हैं, पानी में घुल जाते हैं और पौधे की जड़ों के माध्यम से अवशोषित हो जाते हैं। पौधे के स्वस्थ विकास के लिए मिट्टी में इन पोषक तत्वों की पर्याप्त मा

सुरु होता पावसाळा/ नियमीत खावा टाकळा//

 सुरु होता पावसाळा/ नियमीत खावा टाकळा//  (टिप -  पावसाळा आला ही भाजी कुठंहि मीळते. विदर्भात यास तरोटा म्हणतात. टाकळा भाजी रस्त्याच्या कडेला शेतात बांधावर कुठंही मुबलक मीळते. टाकळा भाजी खातांना लहाणांन्या फार कमी द्यावी मोठ्यांनीही कमीच खावी विरेचक असल्याने पोट जास्तच साफ होण्याचा त्रास होउ शकतो.ऐक दोन चमचे उत्तम)  स्वानुभव - टाकळा बि टाकळा पाने चुर्ण बाळहिरडा नित्यसेवनाने शितपीत्ताचा त्रास कमी होतो. मी लहान असतांना आमचे शेजारी कात्रे काकु असायच्या आमच घराचे मागील बाजुस राहायच्या काका आयसोलेशन नगर पालीका दवाखान्यात नवाथे नगर अमरावतीत सर्व्हीस करत . माझे आईवडील होमीओपॕथी असल्याने व त्यावेळी होमीओपॕथीला कुणी विचारत नसे वडीलांनी संस्था काढली अन आईवर सर्व घराची जबाबदारी आली .आई अमरावती पासुन 15 की.मी.वडाळी येथे प्रॕक्टीसला जायची सकाळी तीथे व संध्याकाळी घरी दवाखाना असायचा.  त्यामुळे आम्ही भांवड शेजारच्या सहवासात जास्त . अश्यात आमटीचा सुंगध आला की मी पळत कात्रे काकुंकडे जात अन भरभरुन जेवत असे .चपाती व कोकम गुळ टाकलेली आमटी म्हणजे अमृतच . मी मराठा(कुणबी) अन काकु ब्राह्मण आमच्या घरात वडील व भाउ