कपाशी पिकातील गुलाबी बोंड अळीचे संपुर्ण नियंत्रणासाठी काय केले पाहिजे आणि फवारणी केव्हा केली पाहिजे
*गुलाबी बोंडअळीचे पतंग अंडि जास्त घालत असल्याने, फक्त गुलाबी बोंड अळी मारूनच चालणार नाही, तर त्या गुलाबी बोंडअळीची अंडी पूर्णतः नष्ट केली, तरच बोंडअळी पासून सुटका होऊ शकते. त्यासाठी लार्विनची फवारणी करावी.*
*लार्विन हे अळी, अंडी आणि पतंग यांना मारते.*
*🎯 लार्विन 30 ग्राम प्रती पंप - फूल अवस्था आणि पाती अवस्था मध्ये फवारणी करावी , कारण बोंडअळी ही फूल आणि पाती मध्येच येते*।
✅ *जीवनचक्र:-*
गुलाबी बोंड अळी ही कापूस पिकावरील एक प्रमुख कीड आहे. मागील काही वर्षांमध्ये या किडने जणूकाही थैमानच घातला आहे. असा शेतकरी नाही, की ज्यांना बोंडअळी माहित नाही. कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी ही ही उशिरा येणारी किडि म्हणजे लागवडीपासून 90 दिवसांत येणारे कीड आहे. परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून ही कीड ६० दिवसांतच आढळून आली आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, जळगाव, बुलढाणा, अकोला, अहमदनगर, नांदेड,वर्धा, यवतमाळ, बीड जिल्ह्यात या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. जवळपास 20 ते 30 टक्क्या पर्यंत उत्पादनामध्ये या किडीमुळे घट झाल्याचे दिसून आले आहे.
🎯गुलाबी बोंड आळीची अंडी आकाराने चपटी व १ मि.मी. लांबट असून रंगाने मोत्यासारखी चकचकीत पांढरी असतात.
🎯गुलाबी बोंड अळीची अंडी कपाशीच्या फुले,बोंडे, देठ व कोवळ्या पानाच्या खाली असतात.
🎯अंडी अवस्था सुमारे ३ ते ५ दिवस राहते व या पक्व झालेल्या अड्यांतून अळी बाहेर पड़ते.
🎯अंड्यातून निघालेली बोंड अळी ही रंगाने पांढुरकी असते, परंतु पूर्ण वाढ झाल्या नंतर ति गुलाबी रंगाची दिसते.
🎯 अळी 21 दिवसापर्यंत कपाशीवर राहते.
🎯अळी फुले व हिरव्या रंगाच्या बोंडाना नुकसान पोहोचवते. ज्या फुलांमध्ये अळी असते, अशी फुले अर्धवट उघडलेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात, त्याला डोमकळी म्हणतात.
🎯 बोंड आळी ही सुरुवातीला फुलं आणि पात्या मध्ये येते. आनी फुलं पात्याच नुकसान करते.
🎯अंड्यातून निघालेली अळी बोंडात शिरल्यानंतर तीच्या विष्ठेने बोंडाचे छिद्र बंद करते, त्यामुळे बोंडाचे दुरुन निरीक्षण केल्याने अळीचा प्रादुर्भाव ओळखता येत नाही.
🎯किडलेल्या पात्या गळून पडतात किंवा अशी बोंडे परिपक न होताच फुटतात.
🎯शेंदरी (गुलाबी) बोंडअळी सरकीचेही नुकसान करते. व कापसाची प्रत बिघडते
21 दिवसानंतर गुलाबी बोंड अळी ही स्वता भोवती कोष निर्माण करुण कोषावस्थेत जाते. कोषावस्थेमध्ये अळी लालसर तपकिरी रंगाची दिसते व सुमारे ८ ते १० मि.मी. लांब असते, तसेच कोषावस्था सुमारे ६ ते २० दिवस राहते व त्यातून पतंग बाहेर येतात. पतंगाची लांबी सुमारे ८ ते ९ मि.मी. असते व ते करड्या रंगाचे दिसतात. पतंगाच्या पुढील पंखावर काळसर पट्टे दिसतात. या किडीची अळी आणि कोश या वस्तीमध्ये सुप्तावस्था दिसून येते. तिची सुप्त अवस्था ही जवळपास दोन वर्षे राहते. किडीचा पतंग सात ते दहा दिवस जगतो आणि तीन ते पाच दिवसात दीडशे ते दोनशे अंडी घालते. ही कीड आपला जीवनक्रम सहा ते आठ आठवड्यामध्ये पूर्ण करते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा