कपाशीवरील रस शोषणाऱ्या कीडीच्या व्यवस्थापनासंदर्भात पीकसंरक्षण स शेतकरी बंधूंनो कापूस पिकात सुरूवातीच्या काळात प्रामुख्याने मावा तुडतुडे फुलकिडे या या रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. पिकाचा रोपावस्थेत तसेच शेवटच्या अवस्थेत कापूस पिकात मावा या रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो.जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून सप्टेंबरच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यापर्यंत तुडतुडे या रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कपाशी पिकावर आढळून येतो. कपाशी पिकात प्रामुख्याने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात प्रामुख्याने फुलकिडी या रस शोषणाऱ्या किडींचा जास्त प्रादुर्भाव आढळून येतो. दोन पावसात जास्त खंड पडल्यास फुलकिडे या किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. पांढरी माशी या रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कपाशी पिकात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतो.पांढरी माशी ही कीड कपाशीच्या पानाच्या खालच्या बाजूने राहून रस शोषण करते अशी पाने कोमजतात व पिल्ले आपल्या शरीरातून गोड चिकट द्रव बाहेर टाकतात त्यामुळे पानावर काळी बुरशी वाढते. शेतक...
शेती विषयक विस्तृत माहिती व शेतीक्षेत्रात केले जाणारे विविध प्रयोग याबद्दल सविस्तर माहिती