जिवाणू व जैविक बुरशीबाबत माहिती
नत्र स्थिर करणारे जिवाणू
यात चार प्रकारचे नत्र स्थिर करणारे जिवाणू आहेत.
हे हवेतील मुक्त नत्र शोषून घेवून पिकांना उपलब्ध करून द्यायचे काम करतात.
1] सहयोगी जिवाणू
अॅसिटोबॅक्टर आणि रायझोबियम यांचा
समावेश होतो.
यांना नत्र स्थिर करण्यासाठी रोपांची गरज असते.
हे रोपांच्या मुळात शिरून मुळावर गाठी निर्माण करतात व त्याद्वारे नत्र स्थिर करतात.
2] सह - सहयोगी
या पध्द्तीत जिवाणू अझोस्पायरीलम मुळामध्ये प्रवेश करून नत्र स्थिर करतात.
3] असहयोगी
प्रकारात जिवाणू अॅझोटोबॅक्टर जमिनीत स्वतंत्र राहून नत्र स्थिर करतात.
यांच्या वापरामुळे रासायनिक खतामध्ये 25-30% बचत होते.
प्रमाण :---
ते 1.5 लिटर प्रति एकर.
स्फुरद विरघळवणारे जिवाणू
स्फुरद विरघळवणारे जिवाणू बॅसिलस मॅगाटेरीयम व्हार फाॅस्फरियम हे जमिनीतून सेंद्रिय कर्बावर जगून वाढीदरम्यान सेंद्रिय आम्ल तयार करून जमिनीतील फाॅस्फरस विरघळवण्याचे कार्य करून पिकांना उपलब्ध करण्याचे काम करतात.यांच्या वापरामुळे मुळांची वाढ होण्यास मदत होते.तसेच वाढ होणारे हार्मोन तयार करतात.
यांच्या वापरामुळे रासायनिक खतांची 25-30% बचत होते.
प्रमाण
1 ते 1.5 लिटर प्रति एकर.
पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया
जिवाणू फ्रटिओरिया औरंशिया जमिनीत वाढ होत असताना जमिनीतील पोटॅश विघटन करण्याचे काम करतात व पोटॅश जमिनीत उपलब्ध स्वरूपात पिकांना पुरवितात.यामुळे पिकांचे उत्पादन, रोगप्रतिकारशक्ती, रंग, साठवणूक क्षमता वाढते.यामुळे रासायनिक खतांची 25-30% बचत होते.
प्रमाण
1 ते 1.5 लिटर प्रति एकर.
स्फुरद विरघळवणारे जिवाणू
हे जिवाणू थायोबॅसिलस थायोक्सीडन्स् हे जमिनीतील स्थिर सल्फर विद्राव्य करून पिकांना उपलब्ध करून द्यावयाचे काम करतात.(सल्फेट फाॅर्म)
या प्रक्रियेला ऑक्झीडेशन प्रोसेस म्हणतात.
2S + 3O2 + H2O --> 2H2SO4
या जिवाणूमुळे जमिनीचा जास्त पी.एच कमी करण्यास मदत होते.
यामुळे पिकांच्या फळांची गोडी, रंग येण्यास मदत होते.
प्रमाण :---
1 ते 1.5 लिटर प्रति एकर.
पसीलोमायसीस
ही बुरशी पॅसीलोमायसीस लिलॅसीनस ही सुत्रकृमीच्या संपर्कात येताच ( अंडी, कोष, अळी) त्यांचे बीजाणू अंकुरतात आणि त्यांना पॅरालिसीसचा अॅटॅक येऊन त्यांचा मृत्यू होतो.सूत्रकृमीमुळे मध्यम आकाराच्या गाठी तयार होऊन मुळाच्या अन्नद्रव्य शोषून घेण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणतात.सूत्रकृमीच्या प्रामुख्याने डाळींब, संत्रा, द्राक्ष, बोर, टोमॅटो, वांगी, भाजीपाला इ. पिकांवर आळून येतो.
प्रमाण :---
जमिनीतून 2 लिटर प्रति एकर.
व्हर्टीसीलीयम
ही व्हर्टीसीलीयम लेकॅनी बुरशी असून ती रस शोषणार्या किडीच्या संपर्कात येताच त्यांचे बीजाणू अंकुरतात व कीटकांच्या शरीरात प्रवेश करून आतील जीवनरसावर वाढतात.
त्यामुळे किडीच्या चयापचायातील संप्रेरके नष्ट होतात.
ज्यामुळे किडीला अंपगत्व येऊन किडीचा मृत्यू होतो.
रस शोषणार्या किडी, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फूल किडे, मिलीबग इ.यांच्या नियंत्रणास वापरण्यास योग्य आहे.
प्रमाण :---
फवारणी---- 5 मिली प्रति लिटर.
जमिनीतून---- 1 लिटर प्रति एकर.
बीवेरीया
ही बुरशी बीवेरीया बसीयाना किडीच्या संपर्कात येताच त्याचे बिजाणू अंकुरतात व कीटकाच्या शरीरात प्रवेश करून आतील जीवनरसावर वाढतात.त्यामुळे चयापचयातील संप्रेरके नष्ट होतात.त्यामुळे कीडींना अपंगत्व येऊन त्यांचा मृत्यू होतो.
हे कठीण कवच असलेल्या किडीवर अत्यंत प्रभावी नियंत्रण करते.बोंडअळी, शेंडअळी, उडद्या, हिरवी अळी, फळ पोखरणारी अळी, हुमणी इ.
प्रमाण :---
फवारणी ---- 5 मिली प्रति लिटर.
जमिनीतून ---- 1 लिटर प्रति एकर.
मेटाॅरायझीयम
ही बुरशी मेटाॅरायझीम अॅनीसोप्ली किडीच्या संपर्कात येताच त्यांचे बिजाणू अंकुरतात व कीटकांच्या शरीरात प्रवेश करून आतील जीवन रसावर वाढतात.
त्यामुळे चयापचयातील संप्रेरके नष्ट होतात.
त्यामुळे किडींना अपंगत्व येऊन त्यांचा मृत्यू होतो.
हे वाळवी, हुमणी, खोडकिडी, मिलीबग, पांढरी माशी इ. करिता अत्यंत प्रभावी नियंत्रण करते.
प्रमाण :---
फवारणी ---- 5 मिली प्रति लिटर.
जमिनीतून ---- 1 लिटर प्रति एकर.
ट्रायकोडर्मा
ट्रायकोडर्मा विरीडी, ट्रायकोडर्मा हारझीनियम आणि ट्रायकोडर्मा हॅमटम या बुरशी असून या मर, मूळकूज, खोडकूज, फळकूज रोग नियंत्रण करण्याकरिता उपयोग होतो.
या बुरशी हानीकारक बुरशी ( फायटोप्थोरा, पिथीयम, फ्युजेरियम, स्केलेरेशीयम व रायझोक्टोनिया तंतूभोवती गुंडाळले जातात व त्यातील अन्नद्रव्ये शोषून घेतात.
परिणामी हानीकारक बुरशी मरतात.
या बुरशी काही प्रकारची एनझाईम निर्मिती करतात.
जी हानीकारक बुरशींना प्रतिबंध करतात.
प्रमाण :---
फवारणी ---- 5 मिली/ग्रॅम प्रति लिटर.
बियाणे ---- 10 मिली/ग्रॅम प्रति किलो.
जमिनीतून ---- 2 लिटर प्रति एकर.
अॅम्पीलोमायसीस
ही अॅम्पीलोमायसीस क्युसकाॅलीस ही बुरशी असून, भुरी रोगाच्या बुरशीवर जगून त्यातील अन्नद्रव्य शोषून घेते.
परिणामी बुरशी मरण पावतात.
ही बुरशी विशिष्ट प्रकारची मॅटॅबोलाईट साठवण करतात.
जी हानीकारक बुरशीला अॅन्टीबायोटिक म्हणून काम करतात.
भुरी रोग येण्याअगोदर तसेच आल्यानंतर नियंत्रण मिळवते.
हे द्राक्ष, डाळिंब, भेंडी, टोमॅटो, गुलाब यावर येणार्या भुरीवर उपयुक्त आहे.
प्रमाण :---
फवारणी ---- 5 ग्रॅम/मिली प्रति लिटर.
अधिक परिणामकरिता ---
10 ते 15 दिवसात कमीत कमी 2 ते 3 फवारणी करणे आवश्यक.
सुडोमोनास
हे सुडोमोनास फ्लोरसेन्स् सूक्ष्म जिवाणू असून हे एक उत्तम जैविक बुरशीनाशक तसेच पिकवाढ संवर्धक आहे.
हे अणुजीवजन्य रोग, मर, मूळकुज, करपा, झाॅन्थोमोनास, फळ व पानावरील काळे डाग यावर उपयुक्त आहे.
हे हानीकारक बुरशीच्या संपर्कात येताच त्याची वाढ झपाट्याने होऊन त्यांच्याभोवती गुंडाळले जातात व त्यातील अन्नद्रव्ये शोषून घेतात.
परिणामी हानीकारक बुरशी मरतात.
प्रमाण :--
फवारणी ---- 5 मिली प्रति लिटर.
बियाण्याकरिता ---- 10 मिली प्रति किलो.
जमिनीतून ---- 2 लिटर प्रति एकर.
बॅसिलस
हे बॅसीलस सबटिलीस हे सूक्ष्म जिवाणू असून ते एक अत्यंत प्रभावी बुरशीनाशक आहे.
अणुजीवजन्य रोग, मर, मूळकुज, पानावरील करपा, झाॅन्थोमोनास, फळ व पानांवरील काळे डाग यावर चांगले प्रभावी आहे.
हे हानीकारक बुरशीच्या संपर्कात येताच त्यांची वाढ झपाट्याने होऊन त्यांच्याभोवती गुंडाळले जातात व त्यातील अन्नद्रव्ये शोषून घेतात.
परिणामी हानीकारक बुरशी मरतात.
याच्या वापरामुळे पिकांमध्ये वाढ संवर्धक एन्झाईम् तयार होण्यास मदत होते.
प्रमाण :---
फवारणी ---- 5 मिली प्रति लिटर
जमिनीतून ---- 2 लिटर प्रति एकर.
चिटोमीयम
चिटोमीयम ग्लोबोसम ही जैविक बुरशी असून पायथोपथोरा बुरशीपासून होणारे ब्लाईट रोग यावर नियंत्रण मिळवते.
ही जैविक बुरशी पायथोपथोरा बुरशीपेक्षा लवकर वाढते आणि बुरशीच्या मुळाला जाण्या अगोदर त्यांना मारून टाकते.
ही बुरशी हानीकारक बुरशीचे अन्नद्रव्ये शोषून घेतात.
परिणामी बुरशी मरण पावतात.
ही बुरशी टोमॅटो, बटाटा पिकावर येणारे ब्लाईट रोगावर अत्यंत प्रभावी आहे.
प्रमाण :---
फवारणी ---- 5 मिली प्रति लिटर.
ड्रीपमध्ये ---- 2 लिटर प्रति एकर.
मायकोरायझा
ही व्हॅसीकुलर अरबूसक्युलर मायकोरायझा बुरशी असून हे वनस्पतीच्या मुळांमध्ये सहयोगी जीवन जगत असतात.
मायकोरायझा हे मुळांच्या आत तसेच बाहेर राहून मुळातील अन्नद्रव्य, कार्बोहायड्रेटस्, अॅमिनो अॅसिड, व्हिटाॅमीन शोषून घेतात.
त्याबदल्यात ते मुळांना फाॅस्फरस, झिंक, पाणी इ. वाहून नेऊन देण्याचे काम करतात.
या बुरशीमुळे जमिनीतील हानीकारक बुरशी, निमॅटोड, पाण्याचा ताण यांना प्रतिबंध करते.
या बुरशीमुळे मुळांची वाढ होण्यास मदत होते.
प्रमाण :---
भाजीपाला ---- 5 किलो प्रति एकर.
डाळिंब/द्राक्ष ---- 10 किलो प्रति एकर.
|| अन्नदाता सुखी भवः ||
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा