मुख्य सामग्रीवर वगळा

ट्रायकोडर्मा व्हीरीडी


ट्रायकोडर्मा व्हीरीडी

ट्रायकोडर्मा बुरशीचा वापर आजकाल सर्व शेतकरी बांधव करताना दिसतात. जस जसे रासायनिक बुराशीनाशकांचे दुष्परिणाम शेतकरी बंधूंना समजू लागले तेव्हा पासून ट्रायकोडर्मा या बुरशीचा रोग नियंत्रणात वापर वाढू लागला आहे.

जमिनीद्वारे, बियांमार्फत पसरणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा बुरशीचा वापर केला जातो. पानांवरील रोगकारक बुरशींच्या नियंत्रणासाठी देखील ट्रायकोडर्माची फवारणी फायदेशीर ठरते आहे; परंतु त्यासाठी बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण शेतात उपलब्ध असणे आवश्यक असते. जमिनीत रासायनिक बुरशीनाशकांची कार्यक्षमता जास्त काळ टिकून राहत नाही, तसेच त्यामुळे जमिनीतील सूक्ष्मजिवांच्या कार्यक्षमतेवर देखील विपरीत परिणाम होतो परंतु ट्रायकोडर्मा बुरशीची कार्यक्षमता जमिनीत खूप काळ टिकून राहते आणि सूक्ष्मजिवांसाठी अनुकूल असते. प्रयोगशाळेत ट्रायकोडर्मा भुकटी (ग्लुकोज बेस ) स्वरूपात तयार केली जाते. जास्तकरून भुकटी (ग्लुकोज बेस पावडर ) स्वरूपातील उत्पादने मातीमध्ये शेणखतातून, सेंद्रिय खतातून मोठ्या प्रमाणात वापरली जातात तसेच पाण्याद्वारे देखील ठिबक सिंचनातून जमिनीत देता येते.

ट्रायकोडर्माची ओळख –

ट्रायकोडर्मा ही एक उपयुक्त बुरशी असून, सेंद्रिय पदार्थांच्या सान्निध्यात चांगल्या प्रकारे वाढते. ही बुरशी मातीमध्ये वाढणारी, परोपजीवी तसेच इतर रोगकारक बुरशींवर जगणारी अशी आहे. या बुरशीच्या 70च्या आसपास प्रजाती आढळतात. त्यापैकी ट्रायकोडर्मा व्हीरीडी, ट्रायकोडर्मा हरजानियम या मोठ्या प्रमाणात जैविक नियंत्रणात वापरल्या जातात.

उपयोग –

1) जमिनीत असणाऱ्या हानिकारक, रोगकारक बुरशी – जसे फायटोप्थोरा, फ्युजॅरिअम, पिथिअम, मॅक्रोफोमिना, स्क्लेरोशिअम, रायझोक्टोनिया इत्यादींचा बंदोबस्त करण्यासाठी ट्रायकोडर्माचा वापर करणे फायद्याचे ठरते. या रोगकारक बुरशींमुळे टोमॅटो, मिरची, वांगी, कांदा यामध्ये मूळकूज, कॉलर रॉट, डाळिंबामध्ये मर रोग इत्यादी रोग होतात, त्यामुळे पिकाचे नुकसान होते.

2) ट्रायकोडर्मा जमिनीत मंद गतीने वाढत असल्या कारणाने दुसऱ्या अपायकारक बुरशींवर उपजीविका करून त्यांची वाढ नियंत्रणात ठेवते.

3) ट्रायकोडर्मा दुसऱ्या बुरशींवर उपजीविका करताना ट्रायकोडर्मिन, ग्लियोटॉक्सिन, व्हिरीडीन यासारखी प्रतिजैविके म्हणजे हानिकारक बुरशींसाठी विषकारक घटक निर्माण करते. तसेच, या बुरशीमुळे सेंद्रिय पदार्थ देखील कुजवून सेंद्रिय खत निर्मितीत ट्रायकोडर्मा मदत करते.

4) सूत्रकृमी नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा प्रति एकरी 250 ग्राम याप्रमाणे 100 किलोग्रॅम शेणखतात मिसळून जमिनित खोलवर मिसळावी. 🙏🏻🙏🏻👉ट्रायकोडर्माचा वापर सुडोमोनॉस फ्लुरोसन्स, पॅसिलोमायसिस यांच्याबरोबर प्रभावीपणे सूत्रकृमी नियंत्रणासाठी केला जाऊ शकतो.👉

5) डाळिंब बागेत मर रोग व सूत्रकृमी नियंत्रणासाठी ट्रायकोडर्माचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. ट्रायकोडर्मा वनस्पतीच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात वाढताना थोड्याफार प्रमाणात अन्नद्रव्ये देखील उपलब्ध करून देते, तसेच रोपांच्या वाढीसाठी उपयुक्त स्राव देखील सोडते, त्यामुळे रोपांची वाढ जोमदार होते.

ट्रायकोडर्माचा वापर –

1) बीजप्रक्रिया करताना ट्रायकोडर्मा 1 किलो बियाण्यास 5 ग्राम या प्रमाणात चोळावे. त्यामुळे जमिनीतून तसेच बियाण्यापासून निर्माण होणाऱ्या मर रोगांचे नियंत्रण ह नियंत्रण होण्यास मदत होते.

3) साधारणपणे चांगल्यापैकी कुजलेल्या शेणखतात 250 ग्राम ट्रायकोडर्मा 100 लीटर पाण्यात मिसळून शेणखताच्या ढिगावर स्प्रे करावा व असे मिश्रण शेतात पेरणीपूर्वी प्रति एकरी वापरावे. ट्रायकोडर्माचा वापर शेणखत, सेंद्रिय खत, निंबोळी पेंड यांच्यासोबत केल्यास चांगल्या प्रकारे फायदा होतो. ओलावा उपलब्ध असताना सेंद्रिय पदार्थात, शेणखतात ट्रायकोडर्मा योग्यरीत्या वाढते.

4) रोपवाटिकेत ट्रायकोडर्मा 250 ग्रामचा वापर 100 लीटर या प्रमाणात केल्यास रोपांची रोपावस्थेत, पुनर्लागवडीनंतर होणारी मर थांबवता येते. भाजीपाला पिकांच्या रोपांची पुनर्लागवड झाल्यानंतर रोपांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात ट्रायकोडर्माची आळवणी करून घ्यावी. त्यामुळे मर (डॅम्पिंग ऑफ) रोगाचा प्रादुर्भाव थांबवता येईल.

विशेष काळजी

ट्रायकोडर्माचा वापर करण्यापूर्वी व केल्यानंतर 3 दिवसांपर्यंत रासायनिक बुरशीनाशकांचा वापर थांबवावा, त्यामुळे ट्रायकोडर्माचा परिणाम चांगला मिळतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उन्हाळी सोयाबीन लागवड | सोयाबीन लागवड | unali soyabin lagwad

  उन्हाळी सोयाबीन लागवड | सोयाबीन लागवड | unali soyabin lagwad उन्हाळी सोयाबीन चे घ्या १५ क्विंटल पर्यंत उत्पादन- महाराष्ट्र खरिप हंगामामध्ये सोयाबीन जवळजवळ ४३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरले गेले. गेल्या हंगामामध्ये पिकाच्या फुलोरा काळात आणि काढणीच्या वेळी झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे प्रति एकर उत्पादन हे ६-८ क्विंटल प्रति एकर इतकेच निघाले. या गोष्टींमुळे पुढील खरीप हंगामामध्ये बियाणे टंचाईचा फटका बसू शकतो. हा प्रश्न मिटण्यासाठी शेतकरी तर पेरणी करतातच परंतु सध्या कृषी विभागसुद्धा उन्हाळी सोयाबीन पेरणीसाठी पुढाकार घेत आहे. उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन घेताना काही महत्वाच्या बाबींकडे लक्ष दिल्यास आपल्याला बीजोत्पादन क्षेत्राचे उत्पादन १०-१५ क्विंटल प्रति एकर मिळू शकते. सोयाबीन साठी जमीन व हवामान - जमिनीचा सामू हा ६.५ - ७.५ व जमिनीमध्ये योग्य प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असणे आवश्यक आहे. तापमान १८ ते ३५ अंश सेल्सियस मध्ये पिकाची वाढ चांगली होते. परंतु फुलोऱ्या दरम्यान तापमान ३५ अंश सेल्सियस पेक्षा जास्त गेल्यास फुलगळ होऊन उत्पादन घटते. सोयाबीन ल...

कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या प्रतिबंध व व्यवस्थापनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स

 कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या प्रतिबंध व व्यवस्थापनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स  राजेश डवरे कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम शेतकरी बंधूंनो कपाशीवरील गुलाबी बोंड अळी अलीकडील काही काळात शेतकऱ्यासाठी कपाशीवरील एक महत्त्वाची नुकसानदायक कीड म्हणून समोर आली आहे. परंतु या किडीच्या प्रतिबंधासाठी व व्यवस्थापनासाठी खालील निर्देशित एकात्मिक व्यवस्थापन सूत्रांचा वापर केल्यास या या किडीचे प्रभावी व्यवस्थापन मिळण्यास मदत होते. (१) शेतकरी बंधुंनो कपाशीवर गुलाबी बोंड अळी प्रतिबंध करण्याकरता कोणत्याही परिस्थितीत फरदड कापूस घेणे टाळावे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात मागील कपाशीचे पीक संपूर्ण कापूस वेचणी करून कपाशी मुक्त झालेले असेल याची दक्षता घ्यावी . फरदड कपाशीला सिंचन केल्याने पाते फुले व बोंडे लागण्यात अनियमितता येऊन गुलाबी बोंड अळी ला सतत खाद्य उपलब्ध होते त्यामुळे फरदड घेणे टाळावे. असे केल्याने गुलाबी बोंड अळी ला खाद्य प्राप्त न झाल्यामुळे जीवनचक्रात बाधा निर्माण होते व पुढील हंगामात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी आढळतो. त्यामुळे  कपाशी...

जीवमृत काय आहे? जीवमृत कसे तयार करावे

जीवामृत शेतकरी मित्रांनो आता आपल्याला जीवामृत चा वापर करून शेती करणे खूप गरजेचे आहे. हरित क्रांतीनंतर भारतामध्ये ज्याप्रमाणे रासायनिक खतांचा वापर डोळे लावून केला जात आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता ही नष्ट होत चाललेली आहे. व भारतातील जवळपास सर्व जमीन नापीक होण्याच्या मार्गावर सध्या आपण सर्वच चाललेलो आहोत. शेतकऱ्याचे कोट्यावधी रुपये रासायनिक खतांमध्ये खर्च होत चालले आहे व त्याचं बरोबर उत्पादना मध्ये सुद्धा घट होत चालली आहे. खर्च जास्त व उत्पादन कमी त्यामुळेेे शेतकऱ्याच्या डोक्‍यावर कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे. आपल्या आहारात  ह्या  विषाच्या वापरामुळे आरोग्य बिघडत चालले आहे. या सर्व समस्यांचं समाधान यावर उपाय म्हणून जैविक शेती ला प्राधान्य मिळत चालले आहे. जैविक शेती साठी लागणारी सामग्री शेतकऱ्याकडे पूर्वीपासून उपलब्ध आहे त्यामुळे जैविक शेतीसाठी खर्च येण्याचा प्रश्न येत नाही त्यामुळे रासायनिक खताचा अतिरिक्त वापर न करता जैविक खतांचा वापर जास्तीत जास्त करणे गरजेचे झाले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कंपोस्टखत, वर्मीकंपोस्ट, जीवामृत, गोमूत्र, याचा वापर करणे गर...