मुख्य सामग्रीवर वगळा

वाटर सोल्युबल ला दानेदार खते पर्याय ठरू शकतात का ? त्याचे फायदे तोटे काय?

 *आजचा प्रश्न*


   वाटर सोल्युबल ला दानेदार खते पर्याय ठरू शकतात का ? त्याचे फायदे तोटे काय?

➖➖➖➖➖➖➖➖➖

मित्रहो

अधुन मधून वाटर सोलुबल च्या भेसळी बाबत बातम्या येतात व शेतकऱ्यांच्या मनात फसवलेजात असल्याची खंत सुरु होते; पण याला जबबाबदार तर आपणच आहोत!!


   मित्रहो 10 -20 वर्षापुर्वी वाटर सोलुबल खते अगदी नव्हतीच म्हटले तरि चुकिचे ठरणार नाही!!

 मग तेव्हा उत्पन्न निघत नव्हते का?  बागा पिकत नव्हत्या का?


    ड्रिप इरिगेशन आले व त्यासोबत वाटर सोलुबल चे तंत्र ही आले !! ज्या इस्राईल मधून हे तंत्र आले ते कंप्यूटर कण्ट्रोल फर्टिगेशन करतात !!

 फ़िल्टर चे प्रेशर गेज वर्षातून कधीतरी पहणारे आम्ही केव्हा कंप्यूटर ऑटोमोशंन समजनार !!

 आमच्याकडे असते ते केवळ आंधळे अनुकरण!!

 ते पीपीएम मध्ये खते देतात आम्ही किलो मध्ये देतो!!

     एखाद्या तंत्राची एक बाजू पाहून आम्ही एवढे वेडे होतो की त्याची दूसरी बाजू आम्हाला दुष्परिणाम दिसल्याशिवय लक्षातच येत नाही!!

➖➖➖➖➖➖➖➖➖

     मित्रहो वाटर सोलुबल आपण ज्या अशास्रीय मोघम पनाने वपरतो त्यामुळे आपण अनेक समस्यान्न तोंड देत आहोत !!! जादा पीपीएम मुळे PH वाढतो EC वाढतो ', झाड़े रेगुलर फर्टिगशन वर डिपेंडेंट बनतात, म्हणजे ख़त देने बंद केले की झाड़ लगेच कमजोर होते  एकाच जागेवर खते मिळाल्यामुळे मातीत मुळांची वाढ खुंटते !! मुळांचा अन्न शोधन्याची प्रक्रिया थांबून जाते!! नेमाटोड , स्ट्रेस मध्ये वाढ होते  व रोगाला पोषक वातावरण मिळते☝

➖➖➖➖➖➖➖➖➖


   मित्रहो... 

          *एक पर्याय आहे तो म्हणजे दानेदार खते बेसल मध्ये वापरणे  भिजवून नीवली करुण ड्रिप मधून सोडने !!*


      आपण जे नेहमी तक्रार करत असतो, खते अपटेक होत नाही त्याचे कारन रासायनिक ख़त असो किंवा सेंद्रिय ख़त ते कच्चे असेल तर अजिबात लागु होणार नाही ते मातीत फिक्स होते व उलट जमींन ख़राब करूँन बुरश्या व रोगन्ना आमंत्रण देते


    *सेंद्रिय खते (शेनखत व इतर ) कुजवले की लागु होतात व् रासायनिक खतांमध्ये ह्यूमस मिसळला की त्यांचे चिलेशन होते व असे मिनरल्स मुलांद्वारे झाड़कडे पाठवले जातात या प्रक्रियेत ह्यूमस चा रोल अत्यंत महत्वपूर्ण आहे*!! 


    जसे कितीही भूक लागली तरी आपण कच्चा तांदुल खावु शकत नाही , शिजलेला भात पाहिजे.

    अगदी तसेच वनस्पतिचे आहे , तिला शिजलेले ख़त म्हणजे ह्यूमस मध्ये चिलेट झालेले ख़त हवे!!

➖➖➖➖➖➖➖➖➖

  आपल्या आजोबांच्या काळात जमिनित ह्यूमस 3-4% होता तेव्हा एका एकरला एक रासायनिक खताची बैग टाकली तरी 100 % लागु व्हायची.. !!


          एका बँग मध्ये एकरी 400 गोनी कांदा पिकायचा , एक 10:26 :26 ची बैग टाकली की 100 क्रेट टोमेटोचा एक तोडा व्हायच्चा!!


 3 ते 4 % असलेला ह्यूमस आता 0.4 % एवढा नापिकतेच्या   पातळीवर आला आहे !! त्यामुळे खते लागु होत नाही व कितीही गोन्या खते टाकली तरी रिजल्ट मिळत नाही. रोगराई मात्र वाढत जाते, कारण कच्चे ख़त न झाडाला चालते न मातिला!!


     *जस जसा मातीत ला ह्यूमस कमी होत गेला तस तसा खतांचा परिणाम कमी होत गेला, त्यामुळे तात्काळ लागु होणारे वाटर सोलुबल एक पर्याय म्हणून समोर आले पण मित्रहो आता तेहि अपटेक करण्यास मातीतिल सुपिकता समर्थ रहिलेली नाही? म्हणून आता काम करायचे ते ह्यूमस वर 

   यामागे शुद्ध सायन्स आहे, ठोकताळा नाही!!

 *अनुभव व सर्वेक्षण असे सांगतात की वाटर सोलुबल पेक्षा दानेदार ची निवली फलबगांसाठी  अधिक सुरक्षित आहे*!! 

     कारणे अनेक आहेत त्यावर नंतर चर्चा करू .खर्च कमी व फायदा जास्त हाही एक फायदाच् आहे 

➖➖➖➖➖➖➖➖➖

   शेतकरी ड्रिपमधुन सोडण्यासाठी खालीलप्रमाणे 

  पर्याय निवड करू शकता ....


12:61:0 ऐवजी 18:46:0 

13:40:13 ऐवजी 12:32:16

19:19:19 ऐवजी 19:19:19

 0:52:34 ऐवजी 10:26:26

 मैग्नेशियम (चिलेटेड) ऐवजी मैग्नेशियम सल्फेट

फेरस (चिलेटेड) ऐवजी फेरस सल्फेट

कैल्शियम (चिलेटेड) ऐवजी कैल्शियम नाइट्रेट किंवा क्लोराइड!!


 प्रमाण :- 

        एकरी दानेदार ख़त 7 - 10 किलो + पानी 30 लीटर 2 तास एकत्र भिजवून नंतर 100 लीटर पाण्यात आदल्या दिवशी रात्रि एकत्र भिजवावे व दुसऱ्या दिवशी ड्रिप मधून निवली गाळून सोडवी

हा डोस दर 10 दिवसांनी देने!!


     जे शेतकरी वाटर सोलुबल च वापरु इच्छित आहेत त्यांनी शक्यतो प्रत्येक दोन दिवसांनी द्यायला हवे!! तसे साइंस च्या संशोधनप्रमाने ते दररोज द्यायला हवे पण आपल्याकडे इस्राइल सारखे कंप्यूटेराईज्ड ऑटोमोशन नाही !! आपण खते त्यांचे आणली व् पद्धत आपल्या सोयीची वापरतो ?

➖➖➖➖➖➖➖➖➖

    वाटर सोलुबल हे ( इंस्टेंट ) लगेच लागु होण्यासाठी बनलेले आहे त्यामुळे ते नियमित थोड़े थोड़े द्यायला हवे !! 

   *शेतकरी मित्रहो ज्याप्रमाणे 4-5 दिवस उपवासी राहुन् त्या सर्व पोळ्या एकाच  दिवशी खावु शकत नाही ??*

*होय ना*

➖➖➖➖➖➖➖➖➖

अगदी त्याचप्रमाने  झाडाला दररोज 1 किलो ख़त द्यायला पाहिजे ते चार पांच दिवसांनी 4 किलो कसे चालेल..??

असो ....

➖➖➖➖➖➖➖➖➖

 जमिनीला रासायनीक खत दिल्यामुळे उत्पन्न जास्त होते ह्या एकाच गोष्टीमुळे सर्व शेतकरी खताचा वापर करतात.जमीन खत खात नाही.उलट खतामुळे जमिनीच्या वरच्या थरात असलेले जिवाणू मरतात.खालील थरातील जिवाणू मेलेले जिवाणू खातात.ऊर्जा निर्माण झाली की पीक होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖

      वारंवार रासायनिक खते दिल्यामुळे आपल्या शेतात असलेल्या जिवाणूंची संख्या कमी झाली आहे.ह्याच कारणामुळे आज पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न मिळत नाही.म्हणून शेतकरी बंधूंना नम्र विनंती आपण रासायनिक खतांचा वापर कमी करून जैविक खत व शेंदिय कार्बन वाढवणारी औषध वापर करा.

➖➖➖➖➖➖➖➖➖

   ज्या प्रमाणे आपल्याला ईश्वराने हात, पाय,तोंड दिले तसे जमिनीला नाही.जमीन खत खात नाही. वारंवार रासायनिक खते दिल्यामुळे आपल्या जमिनी नापीक होत आहेत.


      *सर्व शेतकरी बंधूंना पुन्हा एकदा विनंती वरील लेखामध्ये  सांगितल्या प्रमाणे जमिनीचा पोत सुधारून शेती करा .*

➖➖➖➖➖➖➖➖➖

*धन्यवाद*🙏🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उन्हाळी सोयाबीन लागवड | सोयाबीन लागवड | unali soyabin lagwad

  उन्हाळी सोयाबीन लागवड | सोयाबीन लागवड | unali soyabin lagwad उन्हाळी सोयाबीन चे घ्या १५ क्विंटल पर्यंत उत्पादन- महाराष्ट्र खरिप हंगामामध्ये सोयाबीन जवळजवळ ४३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरले गेले. गेल्या हंगामामध्ये पिकाच्या फुलोरा काळात आणि काढणीच्या वेळी झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे प्रति एकर उत्पादन हे ६-८ क्विंटल प्रति एकर इतकेच निघाले. या गोष्टींमुळे पुढील खरीप हंगामामध्ये बियाणे टंचाईचा फटका बसू शकतो. हा प्रश्न मिटण्यासाठी शेतकरी तर पेरणी करतातच परंतु सध्या कृषी विभागसुद्धा उन्हाळी सोयाबीन पेरणीसाठी पुढाकार घेत आहे. उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन घेताना काही महत्वाच्या बाबींकडे लक्ष दिल्यास आपल्याला बीजोत्पादन क्षेत्राचे उत्पादन १०-१५ क्विंटल प्रति एकर मिळू शकते. सोयाबीन साठी जमीन व हवामान - जमिनीचा सामू हा ६.५ - ७.५ व जमिनीमध्ये योग्य प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असणे आवश्यक आहे. तापमान १८ ते ३५ अंश सेल्सियस मध्ये पिकाची वाढ चांगली होते. परंतु फुलोऱ्या दरम्यान तापमान ३५ अंश सेल्सियस पेक्षा जास्त गेल्यास फुलगळ होऊन उत्पादन घटते. सोयाबीन ल...

कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या प्रतिबंध व व्यवस्थापनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स

 कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या प्रतिबंध व व्यवस्थापनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स  राजेश डवरे कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम शेतकरी बंधूंनो कपाशीवरील गुलाबी बोंड अळी अलीकडील काही काळात शेतकऱ्यासाठी कपाशीवरील एक महत्त्वाची नुकसानदायक कीड म्हणून समोर आली आहे. परंतु या किडीच्या प्रतिबंधासाठी व व्यवस्थापनासाठी खालील निर्देशित एकात्मिक व्यवस्थापन सूत्रांचा वापर केल्यास या या किडीचे प्रभावी व्यवस्थापन मिळण्यास मदत होते. (१) शेतकरी बंधुंनो कपाशीवर गुलाबी बोंड अळी प्रतिबंध करण्याकरता कोणत्याही परिस्थितीत फरदड कापूस घेणे टाळावे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात मागील कपाशीचे पीक संपूर्ण कापूस वेचणी करून कपाशी मुक्त झालेले असेल याची दक्षता घ्यावी . फरदड कपाशीला सिंचन केल्याने पाते फुले व बोंडे लागण्यात अनियमितता येऊन गुलाबी बोंड अळी ला सतत खाद्य उपलब्ध होते त्यामुळे फरदड घेणे टाळावे. असे केल्याने गुलाबी बोंड अळी ला खाद्य प्राप्त न झाल्यामुळे जीवनचक्रात बाधा निर्माण होते व पुढील हंगामात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी आढळतो. त्यामुळे  कपाशी...

जीवमृत काय आहे? जीवमृत कसे तयार करावे

जीवामृत शेतकरी मित्रांनो आता आपल्याला जीवामृत चा वापर करून शेती करणे खूप गरजेचे आहे. हरित क्रांतीनंतर भारतामध्ये ज्याप्रमाणे रासायनिक खतांचा वापर डोळे लावून केला जात आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता ही नष्ट होत चाललेली आहे. व भारतातील जवळपास सर्व जमीन नापीक होण्याच्या मार्गावर सध्या आपण सर्वच चाललेलो आहोत. शेतकऱ्याचे कोट्यावधी रुपये रासायनिक खतांमध्ये खर्च होत चालले आहे व त्याचं बरोबर उत्पादना मध्ये सुद्धा घट होत चालली आहे. खर्च जास्त व उत्पादन कमी त्यामुळेेे शेतकऱ्याच्या डोक्‍यावर कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे. आपल्या आहारात  ह्या  विषाच्या वापरामुळे आरोग्य बिघडत चालले आहे. या सर्व समस्यांचं समाधान यावर उपाय म्हणून जैविक शेती ला प्राधान्य मिळत चालले आहे. जैविक शेती साठी लागणारी सामग्री शेतकऱ्याकडे पूर्वीपासून उपलब्ध आहे त्यामुळे जैविक शेतीसाठी खर्च येण्याचा प्रश्न येत नाही त्यामुळे रासायनिक खताचा अतिरिक्त वापर न करता जैविक खतांचा वापर जास्तीत जास्त करणे गरजेचे झाले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कंपोस्टखत, वर्मीकंपोस्ट, जीवामृत, गोमूत्र, याचा वापर करणे गर...