मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जमिनीलाही मिळणार आधार नंबर !- पहा कसा आहे केंद्र्सरकारचा निर्णय

⛳ जमिनीलाही मिळणार आधार नंबर !- पहा कसा आहे केंद्र्सरकारचा निर्णय 🎯 स्क्रोलअप - महत्वाची माहिती 🪐 💰 अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट मांडताना , जमिनींच्या डिजिटल नोंदणीची घोषणा केली - तर 2023 पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचं ठरवलं ✍️ या डिजिटल नोंदणीनंतर कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन - तुम्हाला फक्त एका क्लिकवर तुमच्या जमिनीशी संबंधित सर्व कागदपत्रे मिळतील 💁‍♂️ पहा डिजिटल लँड रेकॉर्डविषयी ? 🔰 तसे पाहिले तर भारतात 140 दशलक्ष हेक्टर जमिनीवर शेती होते - दरम्यान डिजिटल लँड रेकॉर्ड मध्ये नोंदणी झाल्यानंतर आपल्या जमिनीसाठी 14-अंकी ULPIN क्रमांक मिळेल 🔰 सोप्या भाषेत हा जमिनीचा आधार क्रमांक असेल - या ULPIN क्रमांकाद्वारे जमीन खरेदी-विक्री खूप सोपी होणार 🔰 तसेच डिजिटल रेकॉर्डमुळे जमिनीची खरी स्थिती सुद्धा कळणार - यामध्ये जमिनीचे विभाजन झाल्यास नव्या तुकड्याचा क्रमांक हा वेगळा असेल 🔰 जमिनीचे मोजमाप हे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे होईल - देशामध्ये याची सुरवात सर्वप्रथम नऊ राज्यांमध्ये सुरवात होईल 🔰 यामध्ये महाराष्ट्र, गोवा, बिहार, ओडिशा, सिक्कीम, गुजरात, त्रिपुरा, राजस्थान आण...
अलीकडील पोस्ट

उन्हाळी सोयाबीन लागवड | सोयाबीन लागवड | unali soyabin lagwad

  उन्हाळी सोयाबीन लागवड | सोयाबीन लागवड | unali soyabin lagwad उन्हाळी सोयाबीन चे घ्या १५ क्विंटल पर्यंत उत्पादन- महाराष्ट्र खरिप हंगामामध्ये सोयाबीन जवळजवळ ४३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरले गेले. गेल्या हंगामामध्ये पिकाच्या फुलोरा काळात आणि काढणीच्या वेळी झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे प्रति एकर उत्पादन हे ६-८ क्विंटल प्रति एकर इतकेच निघाले. या गोष्टींमुळे पुढील खरीप हंगामामध्ये बियाणे टंचाईचा फटका बसू शकतो. हा प्रश्न मिटण्यासाठी शेतकरी तर पेरणी करतातच परंतु सध्या कृषी विभागसुद्धा उन्हाळी सोयाबीन पेरणीसाठी पुढाकार घेत आहे. उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन घेताना काही महत्वाच्या बाबींकडे लक्ष दिल्यास आपल्याला बीजोत्पादन क्षेत्राचे उत्पादन १०-१५ क्विंटल प्रति एकर मिळू शकते. सोयाबीन साठी जमीन व हवामान - जमिनीचा सामू हा ६.५ - ७.५ व जमिनीमध्ये योग्य प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असणे आवश्यक आहे. तापमान १८ ते ३५ अंश सेल्सियस मध्ये पिकाची वाढ चांगली होते. परंतु फुलोऱ्या दरम्यान तापमान ३५ अंश सेल्सियस पेक्षा जास्त गेल्यास फुलगळ होऊन उत्पादन घटते. सोयाबीन ल...

कपाशी पिकातील गुलाबी बोंड अळीचे संपुर्ण नियंत्रणासाठी काय केले पाहिजे आणि फवारणी केव्हा केली पाहिजे

  कपाशी पिकातील गुलाबी बोंड अळीचे संपुर्ण  नियंत्रणासाठी काय केले पाहिजे आणि फवारणी केव्हा केली पाहिजे *गुलाबी बोंडअळीचे पतंग अंडि जास्त घालत असल्याने, फक्त गुलाबी बोंड अळी मारूनच चालणार नाही, तर त्या गुलाबी बोंडअळीची अंडी पूर्णतः नष्ट केली, तरच बोंडअळी पासून सुटका होऊ शकते. त्यासाठी लार्विनची फवारणी करावी.*  * लार्विन हे अळी, अंडी आणि पतंग यांना मारते.* *🎯 लार्विन 30 ग्राम प्रती पंप - फूल अवस्था आणि पाती अवस्था मध्ये फवारणी करावी , कारण बोंडअळी ही फूल आणि पाती मध्येच येते*। ✅ *जीवनचक्र:-* गुलाबी बोंड अळी ही कापूस पिकावरील एक प्रमुख कीड आहे. मागील काही वर्षांमध्ये या किडने जणूकाही थैमानच घातला आहे. असा शेतकरी नाही, की ज्यांना बोंडअळी माहित नाही. कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी ही ही उशिरा येणारी किडि म्हणजे लागवडीपासून 90 दिवसांत येणारे कीड आहे. परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून ही कीड ६०  दिवसांतच आढळून आली आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, जळगाव, बुलढाणा, अकोला, अहमदनगर, नांदेड,वर्धा, यवतमाळ, बीड जिल्ह्यात या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला ...

पंजाब डख- राज्यात सह देशातील इतर राज्यात पडणार 29 ऑगस्ट ते 10 संप्टेबर दरम्याण पडणार धो-धो पाउस*

 *पंजाब डख- राज्यात सह देशातील इतर राज्यात पडणार 29 ऑगस्ट ते 10 संप्टेबर दरम्याण पडणार धो-धो पाउस* 🔴 *माहितीस्तव - बंगालच्या उपसागरात विषाखा पटणम जवळ पक 29 तारखेला चक्राकार स्थिती निर्माण होत आहे त्याचे रूपांतर चक्रीवादळात होउन ते महाराष्ट्राकडे झेपवणार आहे . म्हणून आपल्या राज्यात पडणार आहे. 29,30,31 ऑगस्ट व 1,2,3 सप्टेबर राज्यात मुसळधार पाउस पडणार आहे. तो पाउस नांदेड, परभणी लातूर, सोलापूर, उस्मानाबाद सांगली. नगर बिड जालना बुलढाणा , अकोला , अमरावती, यवतमाळ, वाशिम हिंगोली जळगाव धुळे औरंगाबाद नाशिक पूणे नाशिक मुंबई या जिल्हात जास्त पाउस पडणार आहे. या जिल्हातील धरण क्षेत्रात या पावसाने आवक येण्यास सुरवात होइल . उर्वरीत राज्यात देखील ठिक ठिकाणी जोरदार पाउस पडणार आहे. व काही भागात तूरळक पाउस पडेल .जनतेने सर्तक रहावे .*  🟡 *29 ऑगस्ट ते 10 संप्टेबर या दरम्याण महाराष्ट राज्यासह इतर राज्यात देखील पाउस पडणार आहे . तामिळनाडू, केरळ कर्नाटक आंध्रप्रदेश तेलागंणा महाराष्ट्र छत्तीसगड मध्यप्रदेश उत्तरप्रदेश बिहार ओडीला गुजरात राजस्थान या राज्यात देखील 10 संप्टेबर पर्यंत जोरदार पाउस पडेल ...

कामगंध सापळ्याची कीड व्यवस्थापनातील भूमिका

 कामगंध सापळ्याची कीड व्यवस्थापनातील भूमिका          शेतकरी बंधूंनो कीटक हे स्वजातीययांशी सुसंवाद साधण्यासाठी स्वतःच्या शरीरातून विशिष्ट गंध असलेल्या रसायनांचे मिश्रण बाहेर सोडतात ही रसायने त्यांच्यामध्ये विशिष्ट प्रतिक्रिया निर्माण करून संदेशवहनाचे कार्य करतात यांना इंग्रजीत फेरोमोन असे म्हणतात सध्या काही किटकांचे कृत्रिम रित्या तयार केलेले फेरोमोन विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहेत सर्वसाधारणपणे मादी पतंगाच्या वासा द्वारे (कामगंधा द्वारे ) नर पतंगांना आकर्षित करून सापळ्यात पकडून त्यांचा नाश करून म्हणजेच त्यांच्या मिलना मध्ये बाधा निर्माण करून पतंग वर्ग किडीचे व्यवस्थापन मिळण्यासाठी फेरोमन चा मोठ्या प्रमाणात कपाशी, तुर, हरभरा सोयाबीन यासारख्या पिकात वापर होत आहे. समागमासाठी कार्यक्षम सहचर शोधण्यासाठी काम गंधाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो याच्या गंधाने विरुद्धलिंगी कीटक परस्पराकडे मिलनासाठी आकर्षित होतात या तत्त्वाचा वापर प्रामुख्याने खालील तीन प्रकारे कीड व्यवस्थापनासाठी करता येतो  (1) फेरोमोन सापळे वापरून किडींचे सर्वेक्षण करणे  (2) मोठ्या प्रमाण...

कपाशीवरील रस शोषणाऱ्या कीडीच्या व्यवस्थापनासंदर्भात पीकसंरक्षण संदेश

 कपाशीवरील रस शोषणाऱ्या कीडीच्या व्यवस्थापनासंदर्भात पीकसंरक्षण स                  शेतकरी बंधूंनो कापूस पिकात सुरूवातीच्या काळात प्रामुख्याने मावा तुडतुडे फुलकिडे या या रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. पिकाचा रोपावस्थेत तसेच शेवटच्या अवस्थेत कापूस पिकात मावा या रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो.जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून सप्टेंबरच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यापर्यंत तुडतुडे या रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कपाशी पिकावर आढळून येतो. कपाशी पिकात प्रामुख्याने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात  प्रामुख्याने फुलकिडी या रस शोषणाऱ्या किडींचा जास्त प्रादुर्भाव आढळून येतो. दोन पावसात जास्त खंड पडल्यास फुलकिडे या किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. पांढरी माशी या रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कपाशी पिकात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतो.पांढरी माशी ही कीड कपाशीच्या पानाच्या खालच्या बाजूने राहून रस शोषण करते अशी पाने कोमजतात व पिल्ले आपल्या शरीरातून गोड चिकट द्रव बाहेर टाकतात त्यामुळे पानावर काळी बुरशी वाढते. शेतक...

जिवाणू व जैविक बुरशीबाबत माहिती

जिवाणू व जैविक बुरशीबाबत माहिती  नत्र स्थिर करणारे जिवाणू यात चार प्रकारचे नत्र स्थिर करणारे जिवाणू आहेत. हे हवेतील मुक्त नत्र शोषून घेवून पिकांना उपलब्ध करून द्यायचे काम करतात. 1] सहयोगी जिवाणू अॅसिटोबॅक्टर आणि रायझोबियम यांचा   समावेश होतो. यांना नत्र स्थिर करण्यासाठी रोपांची गरज असते. हे रोपांच्या मुळात शिरून मुळावर गाठी निर्माण करतात व त्याद्वारे नत्र स्थिर करतात. 2] सह - सहयोगी या पध्द्तीत जिवाणू अझोस्पायरीलम मुळामध्ये प्रवेश करून नत्र स्थिर करतात. 3] असहयोगी प्रकारात जिवाणू अॅझोटोबॅक्टर जमिनीत स्वतंत्र राहून नत्र स्थिर करतात. यांच्या वापरामुळे रासायनिक खतामध्ये 25-30% बचत होते. प्रमाण :---  ते 1.5 लिटर प्रति एकर.   स्फुरद विरघळवणारे जिवाणू स्फुरद विरघळवणारे जिवाणू बॅसिलस मॅगाटेरीयम व्हार फाॅस्फरियम हे जमिनीतून सेंद्रिय कर्बावर जगून वाढीदरम्यान सेंद्रिय आम्ल तयार करून जमिनीतील फाॅस्फरस विरघळवण्याचे कार्य करून पिकांना उपलब्ध करण्याचे काम करतात.यांच्या वापरामुळे मुळांची वाढ होण्यास मदत होते.तसेच वाढ होणारे हार्मोन तयार करतात. यांच्या वापरामुळे रासायनिक खतांची...