⛳ जमिनीलाही मिळणार आधार नंबर !- पहा कसा आहे केंद्र्सरकारचा निर्णय
🎯 स्क्रोलअप - महत्वाची माहिती 🪐
💰 अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट मांडताना , जमिनींच्या डिजिटल नोंदणीची घोषणा केली - तर 2023 पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचं ठरवलं
✍️ या डिजिटल नोंदणीनंतर कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन - तुम्हाला फक्त एका क्लिकवर तुमच्या जमिनीशी संबंधित सर्व कागदपत्रे मिळतील
💁♂️ पहा डिजिटल लँड रेकॉर्डविषयी ?
🔰 तसे पाहिले तर भारतात 140 दशलक्ष हेक्टर जमिनीवर शेती होते - दरम्यान डिजिटल लँड रेकॉर्ड मध्ये नोंदणी झाल्यानंतर आपल्या जमिनीसाठी 14-अंकी ULPIN क्रमांक मिळेल
🔰 सोप्या भाषेत हा जमिनीचा आधार क्रमांक असेल - या ULPIN क्रमांकाद्वारे जमीन खरेदी-विक्री खूप सोपी होणार
🔰 तसेच डिजिटल रेकॉर्डमुळे जमिनीची खरी स्थिती सुद्धा कळणार - यामध्ये जमिनीचे विभाजन झाल्यास नव्या तुकड्याचा क्रमांक हा वेगळा असेल
🔰 जमिनीचे मोजमाप हे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे होईल - देशामध्ये याची सुरवात सर्वप्रथम नऊ राज्यांमध्ये सुरवात होईल
🔰 यामध्ये महाराष्ट्र, गोवा, बिहार, ओडिशा, सिक्कीम, गुजरात, त्रिपुरा, राजस्थान आणि हरियाणा - या राज्याचा समावेश आहे
🔰 डीजीटल क्रमांक वापरल्याने बेनामी मालमत्ता - म्हणजे जिथे मालमत्ता खरेदीदार/विक्रेत्याचे नाव खरे नाही ते रोखण्यास मदत होईल
📣 *जमिनीलाही आधार नंबर मिळणार* -
शेती विषयक विस्तृत माहिती व शेतीक्षेत्रात केले जाणारे विविध प्रयोग याबद्दल सविस्तर माहिती
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा