मुख्य सामग्रीवर वगळा

*विद्राव्य खते डुबलीकेट कशी बनवली जातात* (water soluble)

*अद्रक शेती*
 
*विद्राव्य खते डुबलीकेट कशी बनवली जातात* (water soluble)
मागील भागात मी आपल्याला बोललो होतो कि आपण पुढील भागात पाण्यात विरघळणारे वॉटर सोलबल खते डुबलीकेट कशी बनवले जातात त्याबद्दल आता आपण सविस्तर माहिती घेऊ. कधीकधी शेतकरी भरपूर खते देऊन व मेहनत करूनही खूप कमी उत्पादन येते.शक्यतो ज्या पिकांना विद्राव्य खते दिली जातात  ती पिके कमी उत्पादन देतात.यामागे खूप कारणे आहेत तरी देखील त्यामध्ये महत्त्वाचे कारण म्हणजे अकार्यक्षम विद्राव्य खते (डुबलीकेट)म्हणून आज आपण विद्राव्य खते डुबलीकेट कशी बनवली जातात त्याबद्दल माहिती घेणार आहोत. *19:19:19* हे खत डुबलीकेट बनवताना युरिया भरडून त्यामध्ये लाल किंवा पिवळा रंग मिक्स करून 25 किलो ची पॅकिंग केली जाते ज्याची कॉस्ट फक्त 160 रुपये येते व त्याची विक्री 1000 ते 1500 रुपये दराने केली जाते. *12:61:00* हे खत डुबलीकेट बनवताना मॅग्नेशियम भरडून त्यामध्ये थोडे पोटॅश मिक्स केले जाते व 25 किलो ची पॅकिंग केली जाते ज्याची कॉस्ट 550 रुपये येते व त्याची विक्री 1500 ते 2000 रुपये याप्रमाणे केली जाते 
*00:00:50* हे खत डुबलीकेट बनवताना 50 किलोच्या गोनीतील पांढरा पोटॅश भरला जातो ज्याची 25 किलो 500 रुपये एवढी येते व त्याची विक्री 1500 ते 2000 रुपये केली जाते.
 *ह्युमिक ऍसिड* हे मूळ दगड स्वरूपात असते व त्याच्या खाणी असतात. दगडी कोळसा बनण्याच्या अगोदर ह्युमिकचाच भाग असतो त्यावर सोडियम हायड्रॉक्साइड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साइड ची किंवा इतर प्रक्रिया करून त्याचा अर्क काढला जातो तो पूर्ण विद्राव्य स्वरूपात गोळा करून त्याची पावडर किंवा फ्लेक्स तयार केले जातात ते शुध्द ह्युमिक असते  पण कच्चा दगड दळून किंवा फ्लेक्स बनवून 10 रुपये किलो कॉस्ट असलेले ह्युमिक 70 ते 80 रुपये किलोने विकले जाते.
*सिविड*( समुद्री शेवाळ)सिविडच्या नावाखाली ह्युमिक पावडर किंवा फ्लेक्स हे सीवीडमध्ये मिक्स केले जाते व त्यावर झिंग्याचा (माशाचा)वास सोडून ते शुद्ध सिविड आहे असे भासवले जाते. डुबलीकेट सिविडची कॉस्ट 50 रुपये किलो असते व ते 300 ते 400 रुपये किलोने विकले जाते.नार्वे किंवा स्पेनचे शुद्ध सिविड मुंबई लँडिंग रेट 600 किलो असते 
अशा अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहे.
म्हणून आपण शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी सगळ्याच कंपन्या फ्रॉड आहे असे नाही.काही कंपन्या खूप चांगल्या आहे त्यांचे प्रॉडक्ट थोडे महाग आहे परंतु क्वालिटी ही चांगली असते त्यामुळे शक्यतो ब्रँडेड कंपनीचे प्रॉडक्ट वापरावे.
                   धन्यवादl
  पुढील भागात आपण डुबलीकेट औषधी कशी बनवली जातात याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत आपल्या गावातील ग्रुप ला माझा नंबर ॲड करा *आपल्याकडील ग्रुपवर ही माहिती शेअर करा जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होईल*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उन्हाळी सोयाबीन लागवड | सोयाबीन लागवड | unali soyabin lagwad

  उन्हाळी सोयाबीन लागवड | सोयाबीन लागवड | unali soyabin lagwad उन्हाळी सोयाबीन चे घ्या १५ क्विंटल पर्यंत उत्पादन- महाराष्ट्र खरिप हंगामामध्ये सोयाबीन जवळजवळ ४३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरले गेले. गेल्या हंगामामध्ये पिकाच्या फुलोरा काळात आणि काढणीच्या वेळी झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे प्रति एकर उत्पादन हे ६-८ क्विंटल प्रति एकर इतकेच निघाले. या गोष्टींमुळे पुढील खरीप हंगामामध्ये बियाणे टंचाईचा फटका बसू शकतो. हा प्रश्न मिटण्यासाठी शेतकरी तर पेरणी करतातच परंतु सध्या कृषी विभागसुद्धा उन्हाळी सोयाबीन पेरणीसाठी पुढाकार घेत आहे. उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन घेताना काही महत्वाच्या बाबींकडे लक्ष दिल्यास आपल्याला बीजोत्पादन क्षेत्राचे उत्पादन १०-१५ क्विंटल प्रति एकर मिळू शकते. सोयाबीन साठी जमीन व हवामान - जमिनीचा सामू हा ६.५ - ७.५ व जमिनीमध्ये योग्य प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असणे आवश्यक आहे. तापमान १८ ते ३५ अंश सेल्सियस मध्ये पिकाची वाढ चांगली होते. परंतु फुलोऱ्या दरम्यान तापमान ३५ अंश सेल्सियस पेक्षा जास्त गेल्यास फुलगळ होऊन उत्पादन घटते. सोयाबीन ल...

कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या प्रतिबंध व व्यवस्थापनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स

 कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या प्रतिबंध व व्यवस्थापनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स  राजेश डवरे कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम शेतकरी बंधूंनो कपाशीवरील गुलाबी बोंड अळी अलीकडील काही काळात शेतकऱ्यासाठी कपाशीवरील एक महत्त्वाची नुकसानदायक कीड म्हणून समोर आली आहे. परंतु या किडीच्या प्रतिबंधासाठी व व्यवस्थापनासाठी खालील निर्देशित एकात्मिक व्यवस्थापन सूत्रांचा वापर केल्यास या या किडीचे प्रभावी व्यवस्थापन मिळण्यास मदत होते. (१) शेतकरी बंधुंनो कपाशीवर गुलाबी बोंड अळी प्रतिबंध करण्याकरता कोणत्याही परिस्थितीत फरदड कापूस घेणे टाळावे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात मागील कपाशीचे पीक संपूर्ण कापूस वेचणी करून कपाशी मुक्त झालेले असेल याची दक्षता घ्यावी . फरदड कपाशीला सिंचन केल्याने पाते फुले व बोंडे लागण्यात अनियमितता येऊन गुलाबी बोंड अळी ला सतत खाद्य उपलब्ध होते त्यामुळे फरदड घेणे टाळावे. असे केल्याने गुलाबी बोंड अळी ला खाद्य प्राप्त न झाल्यामुळे जीवनचक्रात बाधा निर्माण होते व पुढील हंगामात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी आढळतो. त्यामुळे  कपाशी...

जीवमृत काय आहे? जीवमृत कसे तयार करावे

जीवामृत शेतकरी मित्रांनो आता आपल्याला जीवामृत चा वापर करून शेती करणे खूप गरजेचे आहे. हरित क्रांतीनंतर भारतामध्ये ज्याप्रमाणे रासायनिक खतांचा वापर डोळे लावून केला जात आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता ही नष्ट होत चाललेली आहे. व भारतातील जवळपास सर्व जमीन नापीक होण्याच्या मार्गावर सध्या आपण सर्वच चाललेलो आहोत. शेतकऱ्याचे कोट्यावधी रुपये रासायनिक खतांमध्ये खर्च होत चालले आहे व त्याचं बरोबर उत्पादना मध्ये सुद्धा घट होत चालली आहे. खर्च जास्त व उत्पादन कमी त्यामुळेेे शेतकऱ्याच्या डोक्‍यावर कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे. आपल्या आहारात  ह्या  विषाच्या वापरामुळे आरोग्य बिघडत चालले आहे. या सर्व समस्यांचं समाधान यावर उपाय म्हणून जैविक शेती ला प्राधान्य मिळत चालले आहे. जैविक शेती साठी लागणारी सामग्री शेतकऱ्याकडे पूर्वीपासून उपलब्ध आहे त्यामुळे जैविक शेतीसाठी खर्च येण्याचा प्रश्न येत नाही त्यामुळे रासायनिक खताचा अतिरिक्त वापर न करता जैविक खतांचा वापर जास्तीत जास्त करणे गरजेचे झाले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कंपोस्टखत, वर्मीकंपोस्ट, जीवामृत, गोमूत्र, याचा वापर करणे गर...