जीवामृत
शेतकरी मित्रांनो आता आपल्याला जीवामृत चा वापर करून शेती करणे खूप गरजेचे आहे. हरित क्रांतीनंतर भारतामध्ये ज्याप्रमाणे रासायनिक खतांचा वापर डोळे लावून केला जात आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता ही नष्ट होत चाललेली आहे. व भारतातील जवळपास सर्व जमीन नापीक होण्याच्या मार्गावर सध्या आपण सर्वच चाललेलो आहोत. शेतकऱ्याचे कोट्यावधी रुपये रासायनिक खतांमध्ये खर्च होत चालले आहे व त्याचं बरोबर उत्पादना मध्ये सुद्धा घट होत चालली आहे. खर्च जास्त व उत्पादन कमी त्यामुळेेे शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे. आपल्या आहारात ह्या विषाच्या वापरामुळे आरोग्य बिघडत चालले आहे.
या सर्व समस्यांचं समाधान यावर उपाय म्हणून जैविक शेती ला प्राधान्य मिळत चालले आहे. जैविक शेती साठी लागणारी सामग्री शेतकऱ्याकडे पूर्वीपासून उपलब्ध आहे त्यामुळे जैविक शेतीसाठी खर्च येण्याचा प्रश्न येत नाही त्यामुळे रासायनिक खताचा अतिरिक्त वापर न करता जैविक खतांचा वापर जास्तीत जास्त करणे गरजेचे झाले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कंपोस्टखत, वर्मीकंपोस्ट, जीवामृत, गोमूत्र, याचा वापर करणे गरजेचे आहे.
या लेखामध्ये आपण जीवामृत कसे तयार करावे याबद्दलची माहिती घेणार आहोत. यामुळे शेतकरी कमी खर्चात व घरच्या घरी तयार करून जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतात.
काय आहे जीवामृत
शेतकरी मित्रांनो जीवामृत हे एक प्रभावशाली जैविक खत आहे. त्यामध्ये देशी गाईचे शेण व पाणी यामध्ये अजून काही पदार्थ मिसळून ते तयार केले जाते जे पिकाच्या निरोगी वाढीसाठी खूप फायदेशीर आहे. हे पिकाला अनेक रोगांपासून वाचवते व पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते त्यामुळे पीक निरोगी राहते व आपले उत्पादना मध्ये निश्चितच वाढते. मित्रांनो जीवामृत आपण दोन प्रकारेे तयार करू शकतो
1) स्लरी जीवामृत
2) घण जीवामृत
पातळ जीवामृत बनवण्याची पद्धत
मित्रांनो पातळ जीवामृत बनवण्यासाठी आपल्याला खालील साहित्याची गरज असते
1) गावरान गाईचे दहा किलो शेण
2) दहा लिटर गावरान गाईचे गोमुत्र
3) एक किलो वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखालील माती
4) एक किलो हरभर्याच्या डाळीचे पीठ
5) 180 लिटर पाणी
6) दोन किलो सडलेला गूळ
7) दोनशे लिटरची टाकी किंवा ड्रम
वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली मातीला अधिक महत्त्व आहे कारण की वडाचे व पिंपचे झाड कायम ऑक्सिजन देत असते त्यामुळे तेथील तेथील मातीत जिवाणू जास्त संकेत उपलब्ध असतात. हे जिवाणू शेतीची व मातीची सुपीकता वाढविण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात.
सर्वप्रथम गुळाचे पाणी करून घ्यावी त्यानंतर एका पात्रांमध्ये दहा किलो शेण टाकावे व त्यामध्ये दहा लिटर गोमूत्र टाकावे व ते मिश्रण चांगले एकजीव होईपर्यंत त्याला काळीच्या किंवा हाताच्या साह्याने हलवून घ्यावे त्यामध्ये त्यानंतर दोन किलो हरभऱ्याच्या डाळीचे पीठ त्याचप्रमाणे टाकावे व मिक्स करावी त्यानंतर गुळाचे पाणी टाकावे त्यानंतर वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली एक किलो चाळलेली माती टिपण टाकावे व व्यवस्थित रित्या त्याला एकजीव करुन घ्यावे त्यानंतर ड्रममध्ये 180 लीटर एवढे पाणी भरावे व त्यामध्ये हे एकजीव केलेले मिश्रण ओतावे व तयार केलेले मिश्रण हे सावलीत ठेवावे व त्याला रोज सकाळी किंवा सायंकाळी काडी च्या साह्याने हलवावे व तो ड्रम बंद करून ठेवावा शक्यतो ड्रम हवाबंद असल्यास अति उत्तम जीवामृत तयार होण्यासाठी पाच ते सात दिवसाचा कालावधी लागतो तर पाच ते सात दिवस सायंकाळी किंवा संध्याकाळी काडी च्या साह्याने त्याला हलवावे व हलवल्यानंतर तो व्यवस्थित हवाबंद करावा हे सात दिवसानंतर मिश्रण तयार होईल व हे दोनशे लिटर मिश्रण एक एकर जमिनीसाठी पुरेसे आहे शास्त्रज्ञ सांगतात की गावरान गायीच्या 1ग्राम शेणामध्ये 500 कोटी जिवाणू असतात तर आपण दहा किलो शेण वापरतो आहे त्यामध्ये 50 लाख कोटी जिवाणू असतात हे मिश्रण जेव्हा आपण पाण्यात टाकतो तेव्हा 180 लिटर पाण्यामध्येये त्याची 20 मीनटात डबल होते तर सात दिवसांमध्ये त्यांची संख्या अर्बो मध्ये तयार होते जेव्हा आपण ते जमिनीमध्यये सोडतो तेव्हा ते विविध प्रकारचे सूक्ष्म जिवाणू विविध प्रकारच्या जिवाणू आपल्या पिकाला विविध प्रकारच्या अन्नद्रव्यांचा पुरवठा करतात आपल्या जमिनीची सुपीकता वाढवतात व मातीमध्ये हवा खेळती राहण्यास मदत करतात.
जीवामृत च्या वापरामुळे होणारे फायदे
1) जीवामृतचा वापमुळे पिकला अधिक उष्णता व अधिक थंडीपासून बचाव करण्याची शक्ती देते
2) पिकाच्या फऴ व फुलांमध्ये वाढते
3) जीवामृत सर्व प्रकारच्या पिकांसाठी फायदेशीर आहे
4) जीवामृत च्या वापरामुळे भाजीपाला व फळे दिसायला चमकदार व खायला स्वादिष्ट असतात
5) जीवामृताचा वापरामुळे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते
6)जमिनीमधील अन्नद्रव्य पिकाला घेण्यासाठी मदत करते
7) बियाण्याची उगवणशक्ती वाढवण्यास मदत करते
8) जीवामृत वापरामुळे पीक एकसमान व सारखे येते व उत्पादनामध्ये वाढ होते
जीवामृत वारंवार वापरामुळे होणारे जमिनीतील बदल
1)शेतकरी मित्रांनो जीवामृत या वारंवार वापरामुळे जमिनी मध्ये विविध प्रकारच्या जिवाणूंच्या संख्येमध्ये वाढ होते व त्यामुळे आपल्या पिक सदृढ व निरोगी राहण्यास मदत होते
2) मातीची जैविक रासायनिक व भौतिक गुणवत्तेमध्ये वाढ होते राहते व मातीची उत्पादकता वाढते
3) शेतकरी मित्रांनो आपण रासायनिक खतांचा वापर कमी करून जैविक खतांचा वापर वाढवावा व जीवामृत सारख्या विविध जैविक खतांचा वापर करावा जीवामृत हे शेतीसाठी एक वरदानच ठरले आहे.
4) जीवामृत च्या वापरामुळे जमिनीमध्ये ओलावा अधिक काळ टिकून राहतो व माती भुसभुशीत राहून पीक जोमाने वाढ होते व उत्पादनही त्याच अनुप आता मध्ये वाढते
5) जमिनीमध्ये विविध प्रकारचे खनिजे असतात जसे की कॅल्शियम, मॅग्नेशिअम, फेरस, झिंक, कोबाल्ट, सल्फर, बोरोन, कोपर,) है खनिज या जिवाणूच्या माध्यमातून पिकाला दिले जातात त्यामुळे पीक वाढीस मदत होते 6) ही सर्व होण्यासाठी जमिनीचे तापमान 25 तेेेेेे 30 सेल्सियस असावी लागते जमिनीतील ओलावा 70 ते 75 टक्के एवढा असावा लागतो तर हा मेण्टेन करण्यासाठी जीवामृत चा वापर करणे गरजेचे आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा