ट्रायकोडर्मा व्हीरीडी ट्रायकोडर्मा बुरशीचा वापर आजकाल सर्व शेतकरी बांधव करताना दिसतात. जस जसे रासायनिक बुराशीनाशकांचे दुष्परिणाम शेतकरी बंधूंना समजू लागले तेव्हा पासून ट्रायकोडर्मा या बुरशीचा रोग नियंत्रणात वापर वाढू लागला आहे. जमिनीद्वारे, बियांमार्फत पसरणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा बुरशीचा वापर केला जातो. पानांवरील रोगकारक बुरशींच्या नियंत्रणासाठी देखील ट्रायकोडर्माची फवारणी फायदेशीर ठरते आहे; परंतु त्यासाठी बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण शेतात उपलब्ध असणे आवश्यक असते. जमिनीत रासायनिक बुरशीनाशकांची कार्यक्षमता जास्त काळ टिकून राहत नाही, तसेच त्यामुळे जमिनीतील सूक्ष्मजिवांच्या कार्यक्षमतेवर देखील विपरीत परिणाम होतो परंतु ट्रायकोडर्मा बुरशीची कार्यक्षमता जमिनीत खूप काळ टिकून राहते आणि सूक्ष्मजिवांसाठी अनुकूल असते. प्रयोगशाळेत ट्रायकोडर्मा भुकटी (ग्लुकोज बेस ) स्वरूपात तयार केली जाते. जास्तकरून भुकटी (ग्लुकोज बेस पावडर ) स्वरूपातील उत्पादने मातीमध्ये शेणखतातून, सेंद्रिय खतातून मोठ्या प्रमाणात वापरली जातात तसेच पाण्याद्वारे देखील ठिबक सिंचनातून जमिनीत देता येते. ट्रायक
शेती विषयक विस्तृत माहिती व शेतीक्षेत्रात केले जाणारे विविध प्रयोग याबद्दल सविस्तर माहिती