*अद्रक शेती*
*विषय* अद्रक कंदकुज कारणे व उपाय.
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
या भागात आपण कंदकुज होण्याचे कारणे समजून घेणार आहोत. कंदकुज होण्याचे मुख्य कारण आहे हानिकारक बुरशी ही बुरशी कधी तयार होते, ज्यावेळेस जमिनीचे आरोग्य चांगले राहत नाही त्यावेळेस. जमिनीचे आरोग्य चांगले असणे म्हणजे जमीन सजीव असणे. जमीन सजीव करण्यासाठी आपल्याला उपयुक्त जिवाणूंचे कल्चर जमिनीला पाजावे लागते. आता अनेक कंपन्यांनी जमिनीचे कल्चर तयार केलेले आहे.त्याच्याने जमीन भुसभुशीत राहून जमिनीत हवा खेळती राहते व जमिनीत हानिकारक बुरशी तयार होत नाही. दुसरे कारण म्हणजे जमिनीत पाणी साचने,जमिनीत पाणी साचल्याने उपयुक्त जिवाणूंना ऑक्सिजन मिळत नाही आणि हानीकारक बुरशींची उत्पत्ती होण्यास सुरुवात होते.त्यामुळे बेडच्या खालच्या भागात किंवा प्लॉटमध्ये कुठेही पाणी साचणार नाही याची सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. हा प्रकार उद्भवू नये म्हणून लागवड झाल्यानंतर 15 दिवसांनी ट्रायकोडर्मा व सुडोमोनास हे जैविक बुरशीनाशक एकरी एक एक लिटर किंवा एक एक किलो सोडावे ट्रायकोडर्मा ही जैविक बुरशी असून ती हनिकरक बुरशीला खाते. काही शेतकरी कंदकुज लागू नये म्हणून रासायनिक बुरशीनाशक व कीटकनाशक सोडतात आणि त्याने नेमके उलट होते. रासायनिक बुरशीनाशक सोडल्यास उपयुक्त जिवाणू मरतात आणि हानिकारक बुरशीची वाढ व्हायला सुरुवात होते. आपण आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड टाकल्यासारखे घडते.म्हणजे आपण रासायनिक बुरशीनाशके किंवा कीटक नाशक दिल्याने हानिकारक बुरशिला आमंत्रण देतो.त्यामुळे ट्रायकोडर्मा व सुडोमोनास द्यावे आणि हुमणी साठी मेटारायझीयम हे जैविक जिवाणू द्यावे हे तीनही जैविक आहे व विद्यापीठात अत्यल्प दरात मिळतात काही कारणास्तव कंडकुज आल्यास रासायनिक बुरशीनाशके दिल्यास हरकत नाही परंतु येण्याअगोदर कुठलेही रासायनिक बुरशीनाशके वापरू नये त्यांनी कंदकुज येण्याची शक्यता 90 टक्क्यांपर्यंत वाढते म्हणून कधीही जैविक बुरशीनाशकाचा वापर योग्य ठरतो.
धन्यवाद,
उन्हाळी सोयाबीन लागवड | सोयाबीन लागवड | unali soyabin lagwad उन्हाळी सोयाबीन चे घ्या १५ क्विंटल पर्यंत उत्पादन- महाराष्ट्र खरिप हंगामामध्ये सोयाबीन जवळजवळ ४३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरले गेले. गेल्या हंगामामध्ये पिकाच्या फुलोरा काळात आणि काढणीच्या वेळी झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे प्रति एकर उत्पादन हे ६-८ क्विंटल प्रति एकर इतकेच निघाले. या गोष्टींमुळे पुढील खरीप हंगामामध्ये बियाणे टंचाईचा फटका बसू शकतो. हा प्रश्न मिटण्यासाठी शेतकरी तर पेरणी करतातच परंतु सध्या कृषी विभागसुद्धा उन्हाळी सोयाबीन पेरणीसाठी पुढाकार घेत आहे. उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन घेताना काही महत्वाच्या बाबींकडे लक्ष दिल्यास आपल्याला बीजोत्पादन क्षेत्राचे उत्पादन १०-१५ क्विंटल प्रति एकर मिळू शकते. सोयाबीन साठी जमीन व हवामान - जमिनीचा सामू हा ६.५ - ७.५ व जमिनीमध्ये योग्य प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असणे आवश्यक आहे. तापमान १८ ते ३५ अंश सेल्सियस मध्ये पिकाची वाढ चांगली होते. परंतु फुलोऱ्या दरम्यान तापमान ३५ अंश सेल्सियस पेक्षा जास्त गेल्यास फुलगळ होऊन उत्पादन घटते. सोयाबीन ल...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा