*अद्रक शेती*
*विषय* भरघोस उत्पादनासाठी जिवाणूंचे महत्व
नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील भागात मी आपल्याला बोललो होतो की जमिनीतील उपयुक्त जिवाणू बद्दल सविस्तर माहिती घेऊ आणि आज आपण त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. हा विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि तो मी अगदी सोप्या भाषेत आपल्याला समजावून सांगणार आहे.कधी कधी आपण अमाप खर्च करून भरपूर रासायनिक खते औषधे वापरून देखील शेवटला अपेक्षेपेक्षा खूप कमी उत्पादन येते हे होण्यामागील मुख्य कारण आहे ते जीवाणू,
म्हणजे घरात कितीही धान्य असलं तरी स्वयंपाक करणार कोणी नसलं तर त्या धन्याला आपण खाऊ शकत नाही अगदी तसेच आपण कितीही खत दिली तरी ते खतं उपलब्ध स्वरूपात म्हणजे स्वयंपाक स्वरूपात आणण्यासाठी जीवाणूच लागतात.परंतु आपण कधीच जमिनीतील जिवाणूंचे संगोपन केले नाही. त्यामुळे जमीन सजीव राहिली नाही परिणामी उत्पादन घटले.कोणतेही झाड हे खत डायरेक्ट स्वरूपात घेत नाही.त्यावर जिवाणू मार्फत प्रक्रिया होऊन ते उपलब्ध स्वरूपात येते आणि मग पिके सहज घेतात उदा.(पी.एस.बी.)फॉस्फरस सोलबीलिझिंग बॅक्टरिया समजा आपण 100 किलो डीएपी दिले तर त्यात 48% फॉस्फेट असतो म्हणजे 100 किलो मध्ये 48 किलो फॉस्फेट असतो परंतु आपल्या जमिनीत जिवाणू नसेल तर तो फक्त 8 किलो लागू होईल आणि 40 किलो फिक्स फॉममध्ये जाईल त्यासाठी पूर्ण लागू होण्याकरिता जिवाणूच लागेल त्याला दुसरा पर्याय नाही.आणि हे मी फक्त फॉस्फेट बद्दल उदाहरण दिले परंतु पूर्ण अन्नद्रव्य उपलब्ध स्वरूपात आणण्यासाठी वेगवेगळे जिवाणूंची गरज असते. आणि त्याच्यामुळेच अन्नधान्य कारखान्यात तयार होत नाही ते फक्त जमिनीतच तयार होतात.कारण इथे जीवाणू आहेत .म्हणून जमिनीला नेहमी जिवाणू कल्चर द्या
धन्यवाद।
*टिप* शेतकरी या नात्याने मी फक्त माझा अनुभव मांडत असतो.
उन्हाळी सोयाबीन लागवड | सोयाबीन लागवड | unali soyabin lagwad उन्हाळी सोयाबीन चे घ्या १५ क्विंटल पर्यंत उत्पादन- महाराष्ट्र खरिप हंगामामध्ये सोयाबीन जवळजवळ ४३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरले गेले. गेल्या हंगामामध्ये पिकाच्या फुलोरा काळात आणि काढणीच्या वेळी झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे प्रति एकर उत्पादन हे ६-८ क्विंटल प्रति एकर इतकेच निघाले. या गोष्टींमुळे पुढील खरीप हंगामामध्ये बियाणे टंचाईचा फटका बसू शकतो. हा प्रश्न मिटण्यासाठी शेतकरी तर पेरणी करतातच परंतु सध्या कृषी विभागसुद्धा उन्हाळी सोयाबीन पेरणीसाठी पुढाकार घेत आहे. उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन घेताना काही महत्वाच्या बाबींकडे लक्ष दिल्यास आपल्याला बीजोत्पादन क्षेत्राचे उत्पादन १०-१५ क्विंटल प्रति एकर मिळू शकते. सोयाबीन साठी जमीन व हवामान - जमिनीचा सामू हा ६.५ - ७.५ व जमिनीमध्ये योग्य प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असणे आवश्यक आहे. तापमान १८ ते ३५ अंश सेल्सियस मध्ये पिकाची वाढ चांगली होते. परंतु फुलोऱ्या दरम्यान तापमान ३५ अंश सेल्सियस पेक्षा जास्त गेल्यास फुलगळ होऊन उत्पादन घटते. सोयाबीन ल...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा