मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जीवमृत काय आहे? जीवमृत कसे तयार करावे

जीवामृत शेतकरी मित्रांनो आता आपल्याला जीवामृत चा वापर करून शेती करणे खूप गरजेचे आहे. हरित क्रांतीनंतर भारतामध्ये ज्याप्रमाणे रासायनिक खतांचा वापर डोळे लावून केला जात आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता ही नष्ट होत चाललेली आहे. व भारतातील जवळपास सर्व जमीन नापीक होण्याच्या मार्गावर सध्या आपण सर्वच चाललेलो आहोत. शेतकऱ्याचे कोट्यावधी रुपये रासायनिक खतांमध्ये खर्च होत चालले आहे व त्याचं बरोबर उत्पादना मध्ये सुद्धा घट होत चालली आहे. खर्च जास्त व उत्पादन कमी त्यामुळेेे शेतकऱ्याच्या डोक्‍यावर कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे. आपल्या आहारात  ह्या  विषाच्या वापरामुळे आरोग्य बिघडत चालले आहे. या सर्व समस्यांचं समाधान यावर उपाय म्हणून जैविक शेती ला प्राधान्य मिळत चालले आहे. जैविक शेती साठी लागणारी सामग्री शेतकऱ्याकडे पूर्वीपासून उपलब्ध आहे त्यामुळे जैविक शेतीसाठी खर्च येण्याचा प्रश्न येत नाही त्यामुळे रासायनिक खताचा अतिरिक्त वापर न करता जैविक खतांचा वापर जास्तीत जास्त करणे गरजेचे झाले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कंपोस्टखत, वर्मीकंपोस्ट, जीवामृत, गोमूत्र, याचा वापर करणे गरजेचे आहे.           या लेखामध्ये आ

अद्रक कंदकुज कारणे व उपा

*अद्रक शेती* *विषय* अद्रक कंदकुज कारणे व उपाय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, या भागात आपण कंदकुज होण्याचे कारणे समजून घेणार आहोत. कंदकुज होण्याचे मुख्य कारण आहे हानिकारक बुरशी ही बुरशी कधी तयार होते, ज्यावेळेस जमिनीचे आरोग्य चांगले राहत नाही त्यावेळेस. जमिनीचे आरोग्य चांगले असणे म्हणजे जमीन सजीव असणे. जमीन सजीव करण्यासाठी आपल्याला उपयुक्त जिवाणूंचे कल्चर जमिनीला पाजावे लागते. आता अनेक कंपन्यांनी जमिनीचे कल्चर तयार केलेले आहे.त्याच्याने जमीन भुसभुशीत राहून जमिनीत हवा खेळती राहते व जमिनीत हानिकारक बुरशी तयार होत नाही. दुसरे कारण म्हणजे जमिनीत पाणी साचने,जमिनीत पाणी साचल्याने उपयुक्त जिवाणूंना ऑक्सिजन मिळत नाही आणि हानीकारक बुरशींची उत्पत्ती होण्यास सुरुवात होते.त्यामुळे बेडच्या खालच्या भागात किंवा प्लॉटमध्ये कुठेही पाणी साचणार नाही याची सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. हा प्रकार उद्भवू नये म्हणून लागवड झाल्यानंतर 15 दिवसांनी ट्रायकोडर्मा व सुडोमोनास हे जैविक बुरशीनाशक एकरी एक एक लिटर किंवा एक एक किलो सोडावे ट्रायकोडर्मा ही जैविक बुरशी असून ती हनिकरक बुरशीला खाते. काही शेतकरी कंदकुज लागू नये

जिवाणू कल्चर

*अद्रक शेती* *विषय* भरघोस उत्पादनासाठी जिवाणूंचे महत्व नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील भागात मी आपल्याला बोललो होतो की जमिनीतील उपयुक्त जिवाणू बद्दल सविस्तर माहिती घेऊ आणि आज आपण त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. हा विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि तो मी अगदी सोप्या भाषेत आपल्याला समजावून सांगणार आहे.कधी कधी आपण अमाप खर्च करून भरपूर रासायनिक खते औषधे वापरून देखील शेवटला अपेक्षेपेक्षा खूप कमी उत्पादन येते हे होण्यामागील मुख्य कारण आहे ते जीवाणू, म्हणजे घरात कितीही धान्य असलं तरी स्वयंपाक करणार कोणी नसलं तर त्या धन्याला आपण खाऊ शकत नाही अगदी तसेच आपण कितीही खत दिली तरी ते खतं उपलब्ध स्वरूपात म्हणजे स्वयंपाक स्वरूपात आणण्यासाठी जीवाणूच लागतात.परंतु आपण कधीच जमिनीतील जिवाणूंचे संगोपन केले नाही. त्यामुळे जमीन सजीव राहिली नाही परिणामी उत्पादन घटले.कोणतेही झाड हे खत डायरेक्ट स्वरूपात घेत नाही.त्यावर जिवाणू मार्फत प्रक्रिया होऊन ते उपलब्ध स्वरूपात येते आणि मग पिके सहज घेतात उदा.(पी.एस.बी.)फॉस्फरस सोलबीलिझिंग बॅक्टरिया समजा आपण 100 किलो डीएपी दिले तर त्यात 48% फॉस्फेट असतो म्हणजे 100 क