****NPK:- *नत्र*** *-स्फुरद-पालाश***
*19:19:19:-पिकाच्या जोमदार वाढीसाठी*
*12:61:00:-फुटवा जास्त येण्यासाठी*
*18:46:00:-पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी*
*12:32:16:- फुलकळी जास्त येण्यासाठी,फळधारणा जास्त होण्यासाठी*
*10:26:26 :- फळांची साईज वाढवण्यासाठी,फळांची क्वालिटी चांगली होण्यासाठी*
*00:52:34:- झाडांची वाढ थांबवून फुल आणि फळांची वाढ जोमदार पद्धतीने करण्यासाठी,फळांची साईज वाढवण्यासाठी*
*00:00:50:- फळांची क्वालिटी सुधारण्यासाठी,फळांचे वजन वाढवण्यासाठी,साईज वाढवण्यासाठी,चांगला रंग येण्यासाठी,टिकाऊपणा वाढवण्यासाठी.*
🌿 *कृषीमुल्य*🌿
*हे माहीत आहे का?*
मित्रानो आपण वेगवेगळी खते पिकांना देत असतो, पण आपल्याला बऱ्याच खतांचे पिकावर कोणते परिणाम होतात त्यांचे कार्य काय याची माहिती नसते. म्हणून आज जाणून घेऊ
*विद्राव्य खतांचे कार्य...*
🌿 *१९:१९:१९, २०:२०:२०*
या खतांना स्टार्टर ग्रेड म्हणतात.या मध्ये नत्र अमाईड,अमोनिकल, आणि नायट्रेट या तिन्ही _स्वरूपात असतो.या खताचा उपयोग प्रामुख्याने पीकवाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी होतो._
🌿 *१२:६१:०*
या खतास मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणतात.यामध्ये अमोनिकल स्वरूपातील नत्र कमी असतो.तर पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण जास्त असते. _नवीन मुळांच्या तसेच जोमदार शाकीय वाढीसाठी तसेच फुलांच्या योग्य वाढीसाठी व पुनरुत्पादनासाठी या खताचा उपयोग होतो._
🌿 *०:५२:३४*
या खतास मोनो पोटॅशियम फॉस्फेट म्हणतात.यामध्ये स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्य भरपूर आहेत. *_फुले लागण्यापूर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे.डाळिंब पिकामध्ये फळांच्या योग्य पक्वतेकरिता तसेच सालीच्या आकर्षक रंगासाठी हे खत वापरले जाते._*
🌿 *१३:०:४५*
या खतास पोटॅशियम नायट्रेट म्हणतात.यामध्ये नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण अधिक असते. _फुलोऱ्यानंतर च्या अवस्थेत व पक्व अवस्थेत या खताची आवश्यकता असते.अन्ननिर्मिती व त्याच्या वहनासाठी हे खत उपयोगी आहे.या खतामुळे पाणी कमी असताना पिके तग धरू शकतात._
🌿 *०:०:५०+१८*
या खतास पोटॅशियम सल्फेट म्हणतात.पालाश बरोबरच या खतामध्ये उपलब्ध सल्फेट भुरी सारख्या रोगाचेही नियंत्रण होऊ शकते. _पक्वतेच्या अवस्थेत हे खत उपयोगी पडते.हे खत फवारले अशकते.या खतामुळे पीक अवर्षण स्थितीत तग धरू शकते._
अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन मिळवू शकतात। https://www.youtube.com/channel/UC33oGFK4v972IZc64XPrGsQ
🌿 *१३:४०:१३*
पात्या ,फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फुलगळ थांबते.व अन्य पिकांत शेंगाची संख्या वाढते.
🌿 *कॅल्शियम नायट्रेट -*
मुळांची वाढ होण्यासाठी तसेच पीक काटक होण्याच्या दृष्टीने वाढीच्या सुरुवातीच्या काळात व शेंगावाढीच्या अवस्थेत या खताचा वापर होतो.
🌿 *२४:२४:०*ji
यातील नत्र हा नायट्रेट व अमोनिकल स्वरूपातील आहे.शाकीय वाढीच्या तसेच फूलधारणा अवस्थेत त्याचा वापर करता येतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा