मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सुरु होता पावसाळा/ नियमीत खावा टाकळा//

 सुरु होता पावसाळा/ नियमीत खावा टाकळा//  (टिप -  पावसाळा आला ही भाजी कुठंहि मीळते. विदर्भात यास तरोटा म्हणतात. टाकळा भाजी रस्त्याच्या कडेला शेतात बांधावर कुठंही मुबलक मीळते. टाकळा भाजी खातांना लहाणांन्या फार कमी द्यावी मोठ्यांनीही कमीच खावी विरेचक असल्याने पोट जास्तच साफ होण्याचा त्रास होउ शकतो.ऐक दोन चमचे उत्तम)  स्वानुभव - टाकळा बि टाकळा पाने चुर्ण बाळहिरडा नित्यसेवनाने शितपीत्ताचा त्रास कमी होतो. मी लहान असतांना आमचे शेजारी कात्रे काकु असायच्या आमच घराचे मागील बाजुस राहायच्या काका आयसोलेशन नगर पालीका दवाखान्यात नवाथे नगर अमरावतीत सर्व्हीस करत . माझे आईवडील होमीओपॕथी असल्याने व त्यावेळी होमीओपॕथीला कुणी विचारत नसे वडीलांनी संस्था काढली अन आईवर सर्व घराची जबाबदारी आली .आई अमरावती पासुन 15 की.मी.वडाळी येथे प्रॕक्टीसला जायची सकाळी तीथे व संध्याकाळी घरी दवाखाना असायचा.  त्यामुळे आम्ही भांवड शेजारच्या सहवासात जास्त . अश्यात आमटीचा सुंगध आला की मी पळत कात्रे काकुंकडे जात अन भरभरुन जेवत असे .चपाती व कोकम गुळ टाकलेली आमटी म्हणजे अमृतच . मी मराठा(कुणबी) अन काकु ब्राह्मण आमच्या घरात वडील व भाउ